esakal | Zycov-d: कोरोनाच्या इतर लसींपेक्षा काय आहे वेगळेपण?
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

Zycov-d: कोरोनाच्या इतर लसींपेक्षा काय आहे वेगळेपण?

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोरोना (Covid19) विरुद्धच्या लढाईमध्ये भारताला लवकरच आणखी एक लस मिळणार आहे. भारतात आता झायकोव्ह-डी (Zycov-d) ही कोरोनाची स्वदेशी लस देखील लवकरच येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही लस बाजारात उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. झायडस कॅडीलाची जायकोव-डी ही जगातील पहिली लस प्लाज्मिड डीएनएवर (Plasmid DNA) आधारित लस आहे. १२ ते १७ वर्षांच्या बालकांसाठी भारताने मंजूर केलेली एकमात्र लस आहे.

झायडस ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. शर्विल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीची किंमत तंत्रज्ञान, क्षमता आणि आकारावरून ठरवली जाईल. तसेच इतर लसींपेक्षा या लसीची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. वर्षभरात तब्बल १० ते १२ करोड डोस तयार कण्याचा झायडस कॅडिलाचा प्रयत्न असल्याची माहिती डॉ. पटेल यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा: कोरोना लस शोधणं झालं आणखी सोपं; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

तीन डोसची असेल लस

झायकोव्ह-डी या लसीबद्दलची विशेष बाब म्हणजे या लसीचे दोन नाही तर तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा आणि ५६ दिवसांनी तीसरा अशा पद्धतिने हे डोस देण्यात येणार आहेत. कंपनीच्या एमडी शर्विल पटेल यांनी सांगितले की, लवकरात लवकर या लसीला परवानगी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

२५ डिग्रीमध्ये तीन महिन्यांपर्यंत टीकू शकते

झायकोव्ह-डी कोरोना लसीची अजून एक विशेष बाब म्हणजे ही लस २५ डीग्री म्हणजे सामान्य तापमानात देखील स्टोअर केली जाऊ शकते. त्यामुळे वाहकतूक आणि स्टोरेजची समस्या देखील कमी होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top