esakal | ZyCoVD : महिन्याच्या आतच येणार लहान मुलांसाठी लस!
sakal

बोलून बातमी शोधा

CHILD VACCINATION

ZyCoVD : महिन्याच्या आतच येणार लहान मुलांसाठी लस!

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग आता लवकरच मोकळा होणार आहे. कारण महिन्याच्या आतचं लहान मुलांसाठी भारतात लसीकरण सुरु होणार आहे. सुत्रांच्या हवाल्याने एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, झायडस कॅडिला ही कंपनी लहान मुलांसाठी लस उत्पादित करणार आहे. या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षही लवकरच समोर येतील. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही लस उपलब्ध होईल, असं सांगण्यात येत आहे. १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना ही लस देता येणार आहे.

हेही वाचा: मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये – मुख्यमंत्री

देशात सध्या वेगात लसीकरण कार्यक्रम सुरु आहे. आजवर सुमारे ७० कोटी जनतेला लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर देशातील अनेक शहरांनी आपल्या शंभर टक्के लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे. देशातील मोठ्या प्रमाणावर प्रौढ नागरिकांना म्हणजेच १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली आहे. यानंतर आता १८ वर्षांखालील नागरिकांना म्हणजेच मुलांसाठीही लस लवकरच उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: 9/11 Picture Gallery : शांतता, अश्रू अन् फक्त आठवणी!

लहान मुलांनाही लसीकरण सुरु झाल्यानंतर देशातील मोठ्या लोकसंख्येला कोरोनापासून सुरक्षित करता येणार आहे.

loading image
go to top