मुलांना भीती दाखवताय?

रमेश सूद
Thursday, 30 January 2020

एक आई आपल्या मुलावर ओरडत होती. शेजारील प्रतिबंधित भागात काहीतरी काम सुरू असल्याने तेथे जाणे धोक्याचे होते. त्यामुळे ती मुलाला न जाण्याबद्दल दटावत होती. त्यानंतर मुल ऐकत नव्हते. तिने त्याला वॉचमनची भीती दाखविली. तो मुलगा शांत झाला.

इम्प्रूव्ह युअरसेल्फ 
दररोजप्रमाणे मी संध्याकाळी फेरफटका मारत होतो. अचानक माझ्या कानावर आवाज आला. एक आई आपल्या मुलावर ओरडत होती. शेजारील प्रतिबंधित भागात काहीतरी काम सुरू असल्याने तेथे जाणे धोक्याचे होते. त्यामुळे ती मुलाला न जाण्याबद्दल दटावत होती. त्यानंतर मुल ऐकत नव्हते. तिने त्याला वॉचमनची भीती दाखविली. तो मुलगा शांत झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या ऐवजी प्रतिबंधित भागात जाणे कसे धोक्याचे आहे, हे त्या आईने मुलाला समजावून सांगायला हवे होते, असे मला वाटले. वॉचमनच्या भीतीमुळे त्या मुलाने हट्ट सोडला होता, पण वॉचमन नसल्यावर तो त्या ठिकाणी जाण्याची शक्यता होतीच. त्यामुळे त्याच्या वर्तनात चुकीच्या पद्धती रुजण्याची शक्यताही होती. त्यामुळे मी त्याच्या आईकडे गेलो. तिला मुलाला तेथे न जाण्याचे खरे कारण सांगण्याचा सल्ला दिला. सुदैवाने, तिने तो चांगल्या पद्धतीने स्वीकारला आणि माझ्या मताशी सहमती दर्शविली.

अनेकदा आपली कोणत्याही समस्येवर सहजसोपा उपाय शोधण्याची इच्छा असते. गांभीर्याने प्रयत्न करण्याची आपली फारशी तयारी नसते. विशेषतः आपली आराम करण्याची वेळ असते, तेव्हा आपण हे टाळतो. वॉचमनची भीती निर्माण करणे, हे निश्‍चितच सोपे. त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. एक सहजसोपे विधान करायचे, एवढेच. आपल्या मुलांच्या भविष्याला आकार देण्याची वेळ येते, तेव्हा पालक किंवा मोठे म्हणून आपण काही कठीण, कटू निर्णय घ्यायलाच हवेत. आपण आपल्या मुलांशी कसे आणि काय बोलावे, यातून त्याची सुरुवात व्हायला हवी.

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh sood article children