
इंग्रजीच्या परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक विभागासाठी वेगळी योजना बनवावी. पेपरमध्ये पूर्ण गुण मिळविण्यासाठी आणि इंग्रजी परीक्षेच्या तिन्ही विभागांच्या तयारीसाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
10th &12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो, असा करा इंग्रजीचा अभ्यास; मिळतील फुल मार्क्स
नागपूर: परीक्षेत विद्यार्थ्यांचा दुसरा भीतीदायक विषय म्हणजे इंग्रजी. खरंतर इंग्रजी विषय आपण नेहमीच शिकत असतो, बोलत असतो, ऐकत असतो मात्र जेव्हा परीक्षेत इंग्रजीचा पेपर लिहिण्याची वेळ येते तेव्हा अनेक जणांना भीती वाटते. मात्र आता इंग्रजीच्या परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक विभागासाठी वेगळी योजना बनवावी. पेपरमध्ये पूर्ण गुण मिळविण्यासाठी आणि इंग्रजी परीक्षेच्या तिन्ही विभागांच्या तयारीसाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
नक्की वाचा - 10th & 12th Board Preparation: विज्ञानाचा अभ्यास कसा करावा? विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या काही...
रिडींग सेक्शन (Reading section)
या सेक्शनमध्ये प्रामुख्याने पॅसेजेस येतात जे वाचून विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. साधारणतः विद्यार्थ्यांना हे सेक्शन इतर सेक्शनच्या तुलनेत सोपी वाटते. मात्र तसे समजू नका. कारण पॅसेजमधील प्रश्न हे तुम्हाला थोडे बदलून किंवा वेगळ्या पद्धतीने विचारल्या जाऊ शकतात. म्हणूनच दररोज अभ्यास करताना ३ ते ४ पॅसेसेज वाचून त्यामधील प्रश्नांची अचूक उत्तरं देण्याचा प्रयत्न करा.
अनेकदा विद्यार्थी प्रश्नातील कठीण शब्द शोधून पॅसेज न वाचताच तो शब्द पेसेजमध्ये शोधून उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही पद्धत चुकीची आहे. जर तो शब्द पॅसेजमध्ये ४ ते ५ वेळा असेल तर तुमचं उत्तर चुकू शकतं. म्हणून कधीही पॅसेज पूर्ण वाचूनच उत्तरं लिहा.
रायटिंग आणि ग्रामर (Writing & Grammar)
या सेक्शनमध्ये प्रामुख्यानं लेटर लिहिणे, स्टोरीज लिहिणे, नोटीस लिहिणे या प्रकारचे प्रश्न येतात. अनेकदा विद्यार्थी अशा प्रश्नांना घाबरतात. शब्दसंग्रह आणि विचार करण्याची क्षमता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या सेक्शनमध्ये कमी मार्क्स मिळतात. मात्र चिंता करू नका. दररोज एकतरी लेटर लिहायची सवय लावा. अभ्यास करताना कोणालाही एक फॉर्मल आणि एक इंफॉर्मल लेटर लिहून बघा. यामुळे तुमचा शब्दसाठा वाढेल आणि तुम्ही वाक्यरचना करू शकाल.
तसंच इंग्रजी विषयात ग्रामरला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक पॅसेजच्या नंतर ग्रामरवर आधारित प्रश्न असतात. त्यामुळे ग्रामरकॅच रोज सराव करणं आवश्यक आहे. दररोज प्रत्येक प्रकारच्या ग्रामरच्या प्रश्नांचा सराव करा. यामुळे तुम्हाला भरपूर मार्क्स मिळू शकतात.
हेही वाचा - 10th & 12th Board Preparation: गणिताचा अभ्यास कसा करावा? विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या काही...
विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की नियमित सराव आणि रिव्हिजन केल्याशिवाय इंग्रजी परीक्षेत चांगले गुण मिळवणे शक्य नाही. आपल्या चुकांचे विश्लेषण करण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका लिहून बघा आणि परीक्षेत अधिक चांगले करण्यासाठी सुधारण्याचा प्रयत्न करा.
Web Title: 10th 12th Board Preparation Know How Study English Board Exams
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..