10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो, सतत अभ्यास करून कंटाळा आलाय? रिफ्रेश होण्यासाठी 'या' गोष्टी नक्की करा

10th & 12th Board Preparation know what to do while taking breaks while studying
10th & 12th Board Preparation know what to do while taking breaks while studying

नागपूर : "महत्त्वाचं वर्ष आहे आता भरपूर अभ्यास करावा लागणार" असं सतत पालक, नातेवाईक आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येतं. मात्र यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. मग परीक्षा जसजशी जवळ येऊ लागते तसतसे अभ्यासाचे तास वाढू लागतात. मात्र सतत एकाच ठिकाणी बसून अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर, शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अभ्यासाच्या दरम्यान काही काळ ब्रेक्स घेणं आवश्यक आहे. मात्र, या वेळात करणार काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यादरम्यान रिफ्रेश होण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत.

काही वेळ फेरफटका मारून या

अभ्यास करताना आपल्याला सतत एका जागी बसून राहता येत नाही. सतत एका जागी बसून अभ्यास केल्यामुळे काही काळानंतर आपला मेंदू थकतो आणि वाचलेली उत्तरं लक्षात राहत नाहीत. म्हणूनच सतत एकाच जागी बसून भरपूर वेळ अभ्यास करण्यापेक्षा काही वेळ बाहेर जाऊन फेरफटका मारून या. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह शांत होईल आणि तुमचा मेंदूही शांत होईल. तसंच तुम्हाला फ्रेश वाटेल.

स्नायू स्ट्रेच करा

अभ्यास केल्यामुळे तुमचं शरीर अकडू शकतं. तसंच तुमच्या स्नायूंनाही त्रास होऊ शकतो. म्हणूनच काही वेळ स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमचं अकडणार नाही. तसंच तुमच्या स्नायूंनाही स्ट्रेचिंगमुळे बळ मिळेल. यामुळे तुमचा मेंदू आणि तुमचं शरीर रिलॅक्स होईल.

मेडिटेशन करा

तुमच्या अभ्यासातील ब्रेक्समध्ये तुमचं मन आणि तुमच्या मेंदूला शांत आणि रिलॅक्स ठेवण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. हा एक सर्वात चांगला आणि सोपी उपाय आहे. मेडिटेशन करताना डोळे बंद करून शांतपणे मांडी घालून बसा. यादरम्यान तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. असं काही वेळ केल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. तसंच तुमचं मन आणि तुमचा मेंदू रिफ्रेश होईल.

काही खाऊन घ्या

अनेकदा आपल्याला भूक लागल्यामुळे आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तसंच अभ्यास करताना ब्लड शुगर कमी होऊ शकते. म्हणूनच अभ्यासादरम्यान घेतलेल्या ब्रेक्समध्ये काही खाऊन घ्या. ज्यामुळे तुमची ब्लड शुगर स्थिर राहील. तसंच तुमचं संपूर्ण लक्ष अभ्यासात लागेल. मात्र काही खाताना तुमच्या शरीरास उपयुक्त असेच पदार्थ खा. जंक फूडपासून दूर राहा.

१०-१५ मिनिटांची झोप घ्या

आपण अभ्यास करताना आपले डोळे आणि मेंदू हे सतत काम करत असतात. त्यामुळे आपल्याला प्रचंड झोप येते. सतत डुलक्या आल्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येऊ शकतात. म्हणूनच अभ्यासादरम्यान घेतलेल्या ब्रेक्समध्ये १०-१५ मिनिटं झोप घ्या आणि त्यानंतर फ्रेश होऊन परत अभ्यासाला बसा. यामुळे तुमचं लक्ष अभ्यासात राहील आणि तुमचा मेंदू पुन्हा नव्या दमानं काम करेल.

तुमचे छंद जोपासा

प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. परीक्षांच्या काळात अभ्यास करून आपला मेंदू आणि आपलं शरीर थकून जातं. त्यामुळे रिफ्रेश होण्यासाठी तुमचे छंद तुम्हाला मदत करू शकतात. अभ्यासाच्या दरम्यान घेतलेल्या ब्रेक्समध्ये आपले छंद जोपासा. चित्र काढा, पेंटिंग करा, गाणं म्हणा, कुठला गेम खेळा असं काही केल्यामुळे तुमचं शरीर आणि मेंदू रिफ्रेश होईल आणि तुम्ही पुन्हा नव्या जोमानं अभ्यास करू शकाल.

आंघोळ करा

अभ्यासाला बसताना आपण साधारणतः आंघोळ करतोच. मात्र एकाच जागी भरपूर वेळ अभ्यास करत बसल्यामुळे शरीर आणि मेंदूवर ताण येतो. म्हणूनच अभ्यास करताना ब्रेक घेतल्यानंतर १०-१५ मिनिटांत पुन्हा आंघोळ करा. यामुळे तुमच्या मेंदूला आणि शरीराला शांतता मिळेल आणि रिफ्रेश होऊ शकाल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com