कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये दहावीचा पेपर फुटलाच नाही, जुनाच पेपर व्हायरल

10th Exam Paper Leaked
10th Exam Paper Leakedesakal
Summary

दहावीची परीक्षा राज्यभरात सुरळीतपणे पार पडत आहे; पण..

जयसिंगपूर (कोल्हापूर) : दहावीचा विज्ञान-2 विषयाचा पेपर (10th Exam) फुटल्याच्या संशयातून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह पेपर (10th Exam Paper Leaked) असणार्‍या कस्टडीत ठिय्या मारून खातरजमा केली. मात्र, बोगस पेपर देऊन दिशाभूल केल्याचं स्पष्ट झालंय. यातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट झाल्याच्या चर्चेला उधाण आलंय.

पेपरफुटीपेक्षाही हा गंभीर प्रकार असून शिक्षण विभाग आणि पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे. बोगस पेपरच्या माध्यमातून शहरातील अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याची चर्चा सुरूय. पेपरफुटीच्या संशयकल्लोळानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी, पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केलाय.

10th Exam Paper Leaked
'काश्मीर फाइल्स'ला मागे टाकत RRR ची जगभरात 600 कोटींची कमाई

आज (बुधवार) सकाळी कोल्हापुरमधील जयसिंगपूर (Jaysingpur) परिसरात एक शाळेत पेपर फुटला असल्याची अफवा पसरली. सोशल मीडियावर पेपर शेअर करण्यात आले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान-2 विषयाचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला जात होता. हा पेपर पाचशे रुपयांना विक्री होत असल्याचाही आरोप काही पालकांनी केला होता. एवढंच नाहीतर पेपर ठेवलेल्या कस्टडीतून पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. पण, प्रशासनानं तातडीने सर्व तपासणी केली असता, पेपर फुटला नसल्याचं निष्पन्न झालंय. कस्टडीतील सर्व पेपर सुरक्षित आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले पेपर हे जुने असल्याचे समोर आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com