esakal | अकरावीसाठी 11 हजार जागा रिक्त; प्रवेशासाठी CET महत्त्‍वाची!
sakal

बोलून बातमी शोधा

Eleventh Admission

कोरोनाचा प्रसार रोखण्‍यासाठी राबविलेल्‍या अंमलबजावणीमुळे गतवर्षीचे प्रत्‍यक्ष शैक्षणिक कामकाज पूर्णपणे ठप्‍प झाले होते.

अकरावीसाठी 11 हजार जागा रिक्त; प्रवेशासाठी CET महत्त्‍वाची!

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर करत असतानाच पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसाठी १०० गुणांच्‍या सीईटी परीक्षेची (CET Exam) रचना शालांत प्रमाणपत्र मंडळाने केली आहे. ही सीईटी ऐच्‍छिक असली तरी ती चांगल्‍या महाविद्यालयात प्रवेशासाठी तितकीच गरजेची आहे. जाहीर निकालानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ११ हजारांहून अधिक जागा जिल्‍ह्यात प्रवेशासाठी अतिरिक्‍त ठरणार आहेत. (11 Thousand Vacancies For Eleventh Admission In Satara District Education News bam92)

कोरोनाचा (Coronavirus) प्रसार रोखण्‍यासाठी राबविलेल्‍या अंमलबजावणीमुळे गतवर्षीचे प्रत्‍यक्ष शैक्षणिक कामकाज पूर्णपणे ठप्‍प झाले होते. शासन निर्णयानुसार ऑनलाइन पध्‍दतीने अभ्‍यासक्रम पूर्ण करून शाळांनी शैक्षणिक वर्षाची (Academic Year) समाप्‍ती केली. याच काळात शासनाने इयत्ता दहावीच्‍या निकालासाठीचे गुणधोरण आणि निकष जाहीर केले. त्यानुसार माध्‍यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेसाठी जिल्ह्या‍तून ४१ हजार ६३५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर ४१ हजार ५०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी जाहीर होणाऱ्या वेळापत्रकाकडे लागून राहिले आहे.

हेही वाचा: ITI विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

दहावीचा निकाल जाहीर करताना शालांत प्रमाणपत्र मंडळाने अकरावीच्‍या प्रवेशासाठी सीईटी घेण्‍याचे जाहीर केले होते. १०० गुणांची असणारी ही सीईटी ऐच्‍छिक असून त्‍यातील गुणांवर विद्यार्थ्यांना प्राधान्‍यक्रमाने नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळणार आहेत. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार नाहीत, त्‍यांनाही नंतरच्या काळात या दहावीच्‍या गुणानुक्रमानुसार इतरत्र प्रवेश देण्‍याचे धोरण शिक्षण विभाग स्‍तरावर आखण्‍यात येणार आहे. इयत्ता अकरावीत चांगल्‍या आणि नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्‍थ्‍यांसाठी सीईटी हा चांगला पर्याय ठरणार आहे. ही परीक्षा १०० गुणांची असून त्‍यात मिळणाऱ्या गुणांनुसार सायन्‍स, कॉमर्स आणि आर्ट शाखेच्‍या नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश अवलंबून राहणार आहे. ही परीक्षा न देणाऱ्यांना नंतरच्‍या काळात दहावीच्‍या गुणानुक्रमानुसार इतरत्र प्रवेश मिळणार आहे. सीईटीच्‍या गुणांमुळे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतील चुरस निर्माण होणार असून येत्‍या काही दिवसांत या परीक्षेसाठीचे नियोजन शिक्षण विभागाकडून जाहीर होणार आहे.

अकरावीसाठी ४१ हजार विद्यार्थी पात्र

जिल्ह्या‍त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्‍वअर्थसहायित अशी २४५ महाविद्यालये कार्यरत आहेत. या महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रवेश क्षमता ५२ हजार ६०० इतकी असून यंदा झालेल्‍या दहावीच्‍या परीक्षेत ४१ हजार ५०७ विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना सीईटी तसेच दहावी परीक्षेतील गुणानुक्रमानुसार महाविद्यालयांत जागा उपलब्‍ध होणार आहेत. या जागा पूर्ण क्षमतेने भरून झाल्‍यानंतरही जिल्ह्या‍त ११ हजार ९३ इतक्‍या जागा रिक्‍त राहणार आहेत.

11 Thousand Vacancies For Eleventh Admission In Satara District Education News bam92

loading image