ITI विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

ITI First Year
ITI First Yearesakal

कोपर्डे हवेली (सातारा) : कोरोनाने (Coronavirus) सगळीच शैक्षणिक समीकरणे बिघडवली असतानाच आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांची (ITI Students) चिंता वाढली आहे. आयटीआयच्या प्रथम वर्षाच्या (ITI First Year) अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या फेर परीक्षाच झालेल्या नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी व्दितीय वर्षाच्या अंतिम परीक्षेत (ITI Exam) उत्तीर्ण होऊनही पुढील शिक्षणासाठी अपात्र ठरत आहेत. अप्रेंटीसही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. (There Is No First Year Re-examination For ITI Students Education News bam92)

Summary

आयटीआयच्या दोन वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत प्रथम आणि व्दितीय वर्षाच्या दोन सत्रात परीक्षा होतात.

आयटीआयच्या दोन वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत प्रथम आणि व्दितीय वर्षाच्या दोन सत्रात परीक्षा होतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आयटीआयच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. पहिल्या वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या व्दितीय वर्षाच्या परीक्षेसोबत ह्या परीक्षा घेतल्या जातात. परंतु, गेल्यावर्षी पहिल्या सत्रात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्रासोबत परीक्षाच झाल्या नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्टिफिकेट मिळत नाही. त्यातूनच त्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही पालकांनी आयटीआयच्या शिक्षकांकडे चौकशी केली असता, अद्याप बोर्डाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने परीक्षा होऊ शकल्या नसल्याचे सांगण्यात आले.

ITI First Year
नोकरीची संधी! NABARD मध्ये 162 जागांसाठी लवकरच भरती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचे निकाल शैक्षणिक मूल्यमापनाच्या आधारे बनवण्यात आले. तशा प्रकारचा तोडगा काढून आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी पालकांतून होत आहे. या प्रश्‍नावर लवकर मार्ग निघाला नाही, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात-लवकर मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

पुनर्तपासणीबाबत उत्तरच नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना शुन्य गुण मिळाले. काही विद्यार्थ्यांनी पेपर पुन्हा चेकिंगसाठी पैसे भरुन अर्ज केला. परंतु, त्याचे ठोस काही उत्तर आले नाही. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा यंत्रणेवरही शंका निर्माण झाली आहे. यामध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

ITI Students
ITI Students

माझा मुलगा आयटीआयच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याची गुणपत्रिका मिळाली आहे. परंतु, पहिल्या वर्षाची फेरपरीक्षा झाली नसल्यामुळे कोर्स पूर्ण केल्याचे ऑनलाइनला प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही आणि अप्रेंटीसही करता नाही. अनेक विद्यार्थ्यांचे झाले असून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.

-प्रदीप साळवे, पालक

संस्थेकडून वेळोवेळी सगळी पुर्तता करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे फॉर्म व परीक्षा फी आम्ही भरली आहे. परंतु, परीक्षेसंदर्भात बोर्डाकडून कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप आम्हाला मिळाली नाही. परीक्षेसाठी वरिष्ठ पातळीवरुन कार्यवाही होत नाही. तोपर्यंत आम्हाला काही करता येत नाही.

-गजानन सातपुते, लिपीक, आयटीआय, कऱ्हाड

There Is No First Year Re-examination For ITI Students Education News bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com