

12th Exam History Paper Tips: बारावीच्या बोर्ड परीक्षेचा तणाव विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात असतो. अभ्यास करण्याच्या अंतिम टप्प्यात अनेक विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने व किती खोलवर अभ्यास करावा, याबाबत संभ्रम निर्माण होतो. विशेषतः सामाजिक शास्त्रातील इतिहास विषय महत्त्वाचा मानला जातो, कारण तो केवळ शालेय शिक्षणापुरता मर्यादित नाही तर स्पर्धा परीक्षांमध्येही उपयोगी ठरतो.