DRDO Jobs: तरुण-तरुणींनो, कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी

टीम ई-सकाळ
Friday, 8 January 2021

या सर्व पदांसाठी वयोमर्यादा १८ वर्षे ते २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव वर्गांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.

DRDO Vacancy 2021: पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation) मध्ये वेगवेगळ्या पदांवर रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. आयटीआय पासून डिप्लोमा आणि पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. 

या पदांवर करण्यात येणार भरती
ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी - ८० पदे
डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी - ३० पदे
आयटीआय अप्रेंटिस ट्रेनी - ४० पदे
एकूण - १५० पदे

Indian Army Recruitment: तरुण-तरुणींसाठी भारतीय सैन्यात भरतीची सुवर्णसंधी, आताच करा अर्ज​

आवश्यक पात्रता -
वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. आयटीआय व्होकेशनल कोर्स केलेल्या उमेदवारांपासून इंजिनीअरिंगचा डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे आवश्यक पात्रतेसाठी याची सविस्तर अधिसूचना (नोटिफिकेशन) पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे. बातमीच्या शेवटी लिंक देण्यात आली आहे. 

या सर्व पदांसाठी वयोमर्यादा १८ वर्षे ते २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव वर्गांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.

लोकसभा अध्यक्षांच्या मुलीने केली कमाल; पहिल्याच प्रयत्नात झाली IAS​

असा करा अर्ज -
वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डीआरडीओ भरतीच्या अधिकृत वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ७ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली आहे. २९ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अर्ज करण्यासाठीची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे. 

अशी होणार निवड -
या पदांवर भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. पण पात्रतेसाठीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून निवड केली जाणार आहे. अर्ज भरताना दिलेल्या तपशीलांच्या आणि क्वॉलिफिकेशन डॉक्यूमेंट्सच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केले जाणार आहे.

10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; फक्त मेरिटवर होणार भरती!

DRDO अप्रेंटिस अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा 
DRDO अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ►
 क्लिक करा 

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 apprentice vacancies in DRDO for ITI and Graduate candidates