TET परीक्षेकडे 1634 उमेदवारांची पाठ; एसटी संप, पावसाचा परिणाम I TET Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TET Exam

एसटी संप आणि सततच्या पावसामुळे उमेदवारांच्या गैरहजेरीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

TET परीक्षेकडे 1634 उमेदवारांची पाठ; एसटी संप, पावसाचा परिणाम

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : शहरातील १३ केंद्रांवर आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा Maharashtra Teacher Eligibility Test (टीईटी) सुरळीत पार पडली. या परीक्षेच्या पहिल्या व दुसऱ्या पेपरसाठी एकूण एक हजार ६३४ उमेदवार गैरहजर होते. एसटी संप आणि सततच्या पावसामुळे उमेदवारांच्या गैरहजेरीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

टीईटी परीक्षेसाठी (TET Exam) उमेदवारांनी शहरातील परीक्षा केंद्रांवर सकाळपासून गर्दी केली होती. सकाळी साडेदहा ते एक आणि दुपारी दोन ते साडेचार या वेळेत दोन पेपर झाले. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू या माध्यमातून ही परीक्षा झाली. मराठी माध्यमासाठी पाच हजार ३०२ पैकी चार हजार ४८५ उमेदवार उपस्थित होते. इंग्रजी माध्यमासाठी २२३ पैकी १९१, उर्दू विषयासाठी २१ पैकी १८, हिंदी विषयासाठी २९ पैकी २८ अशा चार हजार ७१९ शिक्षकांनी पेपर एकसाठी परीक्षा दिली. त्यामध्ये, पहिल्या पेपरसाठी ८५६ जण गैरहजर होते.

हेही वाचा: 'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

पेपर दोनच्या मराठी माध्यमासाठी पाच हजार ३०१ पैकी चार हजार ५७५, इंग्रजी माध्यमासाठी २६८ पैकी २२४, उर्दू माध्यमासाठी २० पैकी १५, हिंदी माध्यमासाठी २९ पैकी २६ अशा चार हजार ८४० जणांनी परीक्षा दिली. पेपर दोनसाठी ७७८ जण गैरहजर होते. दरम्यान, या परीक्षेसाठी शहरातील कन्याशाळा, भवानी विद्यामंदिर, अनंत इंग्लिश स्कूल, एलबीएस कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, धनंजयराव गाडगीळ कॉलेज, यशवंतराव चव्हाण कॉलेज, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, छत्रपती शाहू अ‍ॅकॅडमी, श्रीपतराव पाटील हायस्कूल, सुशीलादेवी विद्यालय, महाराजा सयाजीराव विद्यालय अशा १३ ठिकाणी परीक्षा घेण्यात आली.

हेही वाचा: Satara: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'; पाहा व्हिडीओ

loading image
go to top