'देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना केलं मतदान' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

'माननीय देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय झालेला आहे.'

'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Satara Bank Election) आज रविवारी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कराड सोसायटी गटातून राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्याविरोधात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिलंय.

या निवडणुकीत कराड तालुक्यातील कोणता गट कोणत्या उमेदवाराला सहकार्य करणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. दरम्यान, आज भोसले गटाचे डॉ. सुरेश भोसले, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले (Atul Bhosle) यांनी थेट सहकारमंत्र्यांच्या पेंडॉलमध्येच बसून ते सहकार मंत्र्यांबरोबर असल्याचे दाखवून दिलंय. त्यामुळं भोसले गटानं सहकारमंत्र्यांना मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'

Atul Bhosle

Atul Bhosle

दरम्यान, मतदानानंतर बोलताना अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्हा बँकेसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सहकारमंत्री स्वतः उमेदवार म्हणून उभे आहेत, त्यामुळं खूप जबाबदारीनं मतदान करणं गरजेचं होतं. पक्षीय पातळीवर माननीय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय झालेला आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले

loading image
go to top