School News : राज्यात 690 अनधिकृत शाळा; राज्यामधील 200 शाळा बंद!

एकूण ६९० शाळा अनधिकृत; पालकांच्या तक्रारीनंतर कारवाई
200 schools closed in maharashtra 690 schools are unauthorized Action taken after parental complaint student future education
200 schools closed in maharashtra 690 schools are unauthorized Action taken after parental complaint student future education esakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्रात अनधिकृत शाळांबाबत पालकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी तक्रारी केल्यामुळे शासनाने शाळा तपासणीची मोहीम हाती घेतली होती.

या शाळा तपासणीत महाराष्ट्रात ६९० अनधिकृत शाळा आढळल्या असून त्यापैकी २०० शाळा शासनाने बंद केल्याचे शासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून लक्षात येते. (200 schools closed in maharashtra 690 schools are unauthorized Action taken after parental complaint student future education)

शाळा म्हणजे संस्काराचे मंदिर समजले जाते. ‘शाळा माझा गुरू, शाळा कल्पतरू’, असे साने गुरुजी सांगत. मात्र, शाळा चालविणाऱ्या विविध कॉर्पोरेट संस्थांसह व्यावसायिक व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रात शाळांचे बाजारीकरण चालविले होते.

यामध्ये जादा दराने शुल्क आकारणे, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे, शाळांमध्ये गणवेश, शैक्षणिक साहित्य विकणे, शाळा चालविणाऱ्या संस्थाचालकांची मनमानी असे प्रकार घडत होते.

यामुळे शासन दरबारी अनेक तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींची दखल घेऊन शासनाने शाळा तपासणी मोहीम हातात घेतली. या शाळा तपासणी मोहिमेमध्ये अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक खुलासे बाहेर आले.

200 schools closed in maharashtra 690 schools are unauthorized Action taken after parental complaint student future education
Ajit Pawar on Prithviraj Chavan : "पृथ्वीराज चव्हाणांसोबत नाईलाजाने काम केलं' अजित पवारांचा गौप्यस्फोट

अनेक शाळा शासनाची परवानगी न घेता चालवल्या जात आहेत. अशा शाळांना शासनाने कायमस्वरूपी कुलूप लावण्याचे धोरण आखले आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या आयुक्तांसह शिक्षण संचालकांनी विविध विभागातील शिक्षण उपसंचालकांना या नियमबाह्य अनधिकृत परवानगी नसलेल्या शाळा बंद करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंबंधी पालकांनाही अनधिकृत शाळेसंदर्भात सजग केले जात आहे. महाराष्ट्रात एकूण ६९० अनधिकृत शाळा असून २०० शाळा शासनाने बंद केल्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करणार असून पालकांनीही सजग राहून आपल्या मुलांना योग्य शाळेत टाकावे. शिक्षण संचालकांच्या परिपत्रकानुसार पुढील कारवाई करणार आहोत. यासाठी जनजागृती सुरू आहे.

- डॉ. बी बी चव्हाण, शिक्षण उपसंचालक

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

200 schools closed in maharashtra 690 schools are unauthorized Action taken after parental complaint student future education
Ajit Pawar Interview: PM मोदींचं भवितव्य काय? त्यांना हरवणं शक्य आहे का? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं

विभाग - अनधिकृत शाळा - बंद केलेल्या शाळा

  • मुंबई - ५१७ - ८८

  • पुणे - ६९ - ३२

  • लातूर - १ - ०

  • कोल्हापूर - २८- २७

  • छत्रपती संभाजीनगर -६- ६

  • नागपूर- ४० -३५

  • अमरावती -२- २

  • नाशिक -२७ - १०

200 schools closed in maharashtra 690 schools are unauthorized Action taken after parental complaint student future education
Ajit Pawar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कामाचं केलं कौतुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com