Study Tour : जिल्हा परिषदेच्या २७ विद्यार्थ्यांची गगनभरारी; विमानाने श्रीहरीकोट्याकडे रवाना

शैक्षणिक सहल; विमानाने श्रीहरीकोट्याकडे रवाना, विभागीय आयुक्त केंद्रेकरांची संकल्पना
27 students of Zilla Parishad schools visit scientific and historical centers real experience of satellite launch study tour
27 students of Zilla Parishad schools visit scientific and historical centers real experience of satellite launch study toursakal

परभणी : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेमुळे येथील जिल्हा परिषद शाळांमधील २७ विद्यार्थी मंगळवारी (ता.१६) उपग्रह प्रक्षेपनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासह विविध वैज्ञानिक, एैतिहासिक केंद्रांना भेटी देण्यासाठी विमानाने रवाना झाले.

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचे पाल्यच शिक्षण घेतात, अशी परिस्थिती आहे. त्यांच्यासाठी शैक्षणिक सहल म्हणजे दिव्यच. परंतु, या तळागाळातील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा, त्यांनाही विमानात बसण्याची संधी मिळावी, म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करुन दिली.

त्यासाठी अधिकारी वर्गाला निधी देखील देण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्थळे देखील निश्चित करण्यात आली होती. श्रीहरीकोटा येथील अंतरीक्ष केंद्र येथे उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, म्हणून हे स्थळ निश्चित करण्यात आले. तसेच थुंबा येथील स्पेश म्युझियम, विश्वेश्वरय्या इंडस्ट्रिअल ॲण्ड टेक्निकल म्युझियमचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात आला.

27 students of Zilla Parishad schools visit scientific and historical centers real experience of satellite launch study tour
Indian Rupee History: 16व्या शतकात पहिल्यांदाच रुपया आला चलनात, असा आहे भारतीय रुपयाचा आत्तापर्यंतचा प्रवास

सेस फंडातून निधी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मून, प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी या सहलीचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक रवाना

येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतून मंगळवारी सकाळी २७ विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक ट्रॅव्हल्सद्वारे हैदराबादकडे रवाना झाले. तेथून त्यांचा विमान प्रवास सुरु होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे, विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, सुधीर सोनुनकर, डॉ. कोमल शिंदे, शिक्षिका सारिका गिरी व पद्मजा गोरे यांचा देखील समावेश आहे.

27 students of Zilla Parishad schools visit scientific and historical centers real experience of satellite launch study tour
Scientific Studies : मृत्यूवेळी व्यक्तीच्या डोक्यात काय सुरू असतं? शास्त्रज्ञांनी शोधून काढलं...

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंशिकर यांनी बसला झेंडी दाखवली. याप्रसंगी डॉ. रामेश्वर नाईक, शिरीष लोहट, शेख अंसारी, डॉ. पी. आर. पाटील, डॉ. विजयकिरण नरवाडे, दीपक शिंदे, महेश शेवाळकर, बाळू बुधवंत, कमल चव्हाण, अशोक लाड, बबलू पवार आदींची उपस्थिती होती.

27 students of Zilla Parishad schools visit scientific and historical centers real experience of satellite launch study tour
Educational Material: पालकांच्या खिशावर GSTमुळे बोजा! शैक्षणिक साहित्यात 20 ते 50 टक्क्यांपर्यंत किमतीत वाढ

उंच आकाशातील विमान अन् प्रत्यक्ष विमान प्रवास करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी रोमांचकारी असेल. विद्यार्थ्यांना उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आगामी जडण- घडणीसाठी या सहलीचा नक्की उपयोग होईल. म्युझियम संकल्पना, तसेच थुंबा येथील स्पेस म्युझियम विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा नक्की रुंदावेल, विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धींगत होण्यास चालना मिळेल. विमानवारी विद्यार्थ्यांना अनमोल असं ज्ञान देऊन जाईल.

— विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी (प्रा.), शिक्षण विभाग, जि.प., परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com