अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत 40 हजार 565 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले

शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली; प्रवेश नाकारणाऱ्या तिसऱ्या फेरीत संधी नाही.
Online-Admission
Online-AdmissionSakal

शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली; प्रवेश नाकारणाऱ्या तिसऱ्या फेरीत संधी नाही.

40,565 students denied admission second merit list class 11th admission

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत 40 हजार 565 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता यादीत ७१ हजार ६८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित होऊनही आपले प्रवेश नाकारले असताना आता दुसऱ्या फेरीच्या गुणवत्ता यादी नंतरच्या प्रवेश प्रक्रियेनंतर तब्बल 40 हजार 565 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले असल्याची माहिती आज मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाकडून देण्यात आली. दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळूनही ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत, अथवा त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत संधी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत 69 हजार 691 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला मात्र यांपैकी तब्बल 40 हजार 565 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. तर 127 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला असून 78 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले असल्याची माहिती समोर आल्याने शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढणार आहे.

अकरावीच्या दुसऱ्या प्रवेशफेरीत 24 हजार 146 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. यातील कला शाखेत 2 हजार 269, वाणिज्य 13 हजार 846, विज्ञान 7 हजार 835 तर एचएसव्हीसी शाखेत 196 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दुसऱ्या यादीत स्थान मिळालेल्या एकूण 24 हजार 146 विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 121 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. यातील 11 हजार 377 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर 34 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला असून 39 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला आहे. तर 2 हजार 795 जणांनी प्रवेशासाठी कोणताच प्रतिसाद दिला नाही.

दुसऱ्या फेरीचे असे झाले प्रवेश

शाखा कोटा प्रवेश प्रवेश घेतला रिक्त जागा

कला 3218 14,336 21,468

वाणिज्य 19,337 64,408 77,660

विज्ञान 12,644 47,146 41,614

एचएसव्हीसी 165 1201 2354

एकूण 35,364 1,27,091 1,14,096

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com