esakal | मुलांना शाळेत पाठवायला ८४ टक्के पालक तयार; SCERT चा सर्व्हे
sakal

बोलून बातमी शोधा

School

मुलांना शाळेत पाठवायला ८४ टक्के पालक तयार; SCERT चा सर्व्हे

sakal_logo
By
- मीनाक्षी गुरव

पुणे : कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीचे वर्गाप्रमाणेच अन्य इयत्तांमधील वर्ग सुरू करण्याबाबत मागणी होत आहे. परंतु नेमकं याबाबत पालक आणि शिक्षकांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत सव्वा दोन लाख पालकांनी मते नोंदविली असून त्यातील जवळपास ८४ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा: मनाली: मास्क नसेल तर पाच हजारांचा दंड आणि 8 दिवस तुरुंगवास

कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाप्रमाणेच इतर इयत्तांमधील वर्ग सुरू करावेत का, या प्रश्नांचे उत्तर आता ‘एससीईआरटी’च्या ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे पालक आणि शिक्षकांकडून जाणून घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालातून शाळा सुरू करण्याबाबत पालक आणि शिक्षक आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्वेक्षण येत्या सोमवारपर्यंत (ता.१२) सुरू राहणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु हा निर्णय जाहीर झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ञांनी आणि शैक्षणिक संस्थांकडून इतर वर्गही सुरू करण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्य इयत्तांच्या शाळा सुरू करण्याबाबत पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: केरळमध्ये 'झिका' विषाणूचे 14 रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर

  • - सर्वेक्षणासाठी लिंक : http://www.maa.ac.in/survey

  • - सर्वेक्षणाची अंतिम तारीख : १२ जुलै

सर्वेक्षणात मते नोंदविलेल्या पालकांची आकडेवारी :

  • - मते नोंदविलेले एकूण पालक : २,२५,१९४

  • - ग्रामीण भागातील पालक : ५२.४८ टक्के (१,१८,१८२)- निमशहरी भागातील पालक : १०.६३ टक्के (२३,९४८)- शहरी भागातील पालक : ३६.८९ टक्के (८३,०६४)

शाळेत पाठवायला इच्छुक असणारे आणि इच्छुक नसणारे पालक :

  • - शाळेत पाठवायला तयार असणारे : १,८९,०९५ (८३.९७ टक्के)

  • - शाळेत पाठवायला तयार नसणारे : ३६,०९९ (१६.०३ टक्के)

    (शनिवारी सायंकाळपर्यंतची आकडेवारी)

loading image