esakal | केंद्रीय विद्यालयाची अधिसूचना जारी ! "या' विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय विद्यालयाची अधिसूचना जारी! 'या' विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक

केव्हीएसनुसार केंद्रीय विद्यालयांमधील अकरावी वर्ग वगळता इतर सर्व वर्गांच्या प्रवेशाची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. इयत्ता दहावीच्या प्रवेश प्रक्रियेचा निर्णय दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर घेण्यात येईल.

केंद्रीय विद्यालयाची अधिसूचना जारी! 'या' विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : केंद्रीय विद्यालयांच्या (Kendriya Vidyalaya) अधिसूचनेनुसार ज्या पालकांनी आपल्या मुलाच्या दुसऱ्या वर्गात किंवा वरील कोणत्याही वर्गात प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला असेल, त्यांच्यासाठी 30 जुलै दरम्यान आणखी एक गुणवत्ता यादी दिली जाईल. ही यादी केवळ संबंधित केंद्रीय विद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. म्हणून, ज्या शाळेत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेची वेबसाइट वेळोवेळी तपासत राहा. (A new notification has been issued for Kendriya Vidyalaya students-ssd73)

हेही वाचा: इंडिया पोस्टमध्ये नोकऱ्या! दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज

केव्हीएसच्या (KVS) म्हणण्यानुसार, केंद्रीय विद्यालयांमधील 11 वी वगळता सर्व वर्गांच्या प्रवेशाची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. इयत्ता दहावीच्या प्रवेश प्रक्रियेचा निर्णय दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर घेण्यात येईल. केव्हीएसच्या प्रवेश नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे, की यावेळी अनुसूचित जमातीसाठी 15 टक्केजागा, एसटीसाठी 7.5 टक्के आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी-एनसीएल) साठी 27 टक्के जागा सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये नव्या प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतील. यापुढे नवीन प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपैकी 3 टक्के जागा आरटीई अधिनियम 2009 च्या तरतुदीनुसार वेगवेगळ्या दिव्यांग मुलांसाठी राखीव ठेवल्या जातील.

हेही वाचा: ऑनलाइन शिक्षणामुळे वाढले आजार! "ई-क्‍लिनिक'द्वारे समस्या सोडवणे शक्‍य

प्रवेशासाठी आवश्‍यक ही कागदपत्रे

  • मुलाचे जन्म प्रमाणपत्र : मुलाचे जन्म प्रमाणपत्र महानगरपालिकेसारख्या मान्यताप्राप्त संस्थांकडून दिले गेलेले असावे.

  • नात्याचे प्रमाणपत्र : खासदार किंवा पीएसयू कर्मचाऱ्यांच्या नातवंडांसाठी त्यांच्या नात्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हा नियम केव्हीएस कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही लागू होईल.

  • जातीचे प्रमाणपत्र : एससी / एसटी / ईडब्ल्यूएस / बीपीएल किंवा ओबीसी प्रवर्गातील मुलांना प्रवेशासाठी जातीचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.

  • अपंगत्व प्रमाणपत्र : जर मूल दिव्यांग असेल तर त्यासाठी प्रमाणपत्र द्यावे लागेल.

  • हस्तांतरण प्रमाणपत्र : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला गेल्या सात वर्षांत झालेल्या बदली व तुम्ही सैन्यातून निवृत्त झाले असल्यास त्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.

  • निवासी प्रमाणपत्र : रहिवासी प्रमाणपत्र सर्व मुलांनी दिलेच पाहिजे.

loading image
go to top