जाणून घ्या कॅम्पस प्लेसमेंटबद्दल ...

शीतलकुमार रवंदळे
Thursday, 16 January 2020

कॅम्पस प्लेसमेंटचे प्रकार
ऑन कॅम्पस प्लेसमेंट
ऑफ कॅम्पस प्लेसमेंट
पूल कॅम्पस प्लेसमेंट 
जॉब फेअर

कॅम्पस प्लेसमेंटचे प्रकार
ऑन कॅम्पस प्लेसमेंट

या प्रकारात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्याच महाविद्यालयात एखाद्या कंपनीतर्फे शैक्षणिक वर्षादरम्यान (वार्षिक परीक्षेपूर्वी) रोजगाराची प्रक्रिया राबवली जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑफ कॅम्पस प्लेसमेंट
शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर महाविद्यालयात, कंपनीत, इतर ठिकाणी एका महाविद्यालयातील किंवा अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी कंपनीतर्फे रोजगार भरतीची प्रक्रिया राबवली जाते. काही वेळा यात इतर कुठल्याही महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाते.

पूल कॅम्पस प्लेसमेंट
या प्रकारात शैक्षणिक वर्षादरम्यान (अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी) काही ठरावीक महाविद्यालयांचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स एकत्र येऊन अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी एखाद्या कंपनीतर्फे रोजगार भरतीची प्रक्रिया राबवतात. यात कंपनीचा वेळ व खर्च वाचतो. 

जॉब फेअर
या प्रकारात अनेक कंपन्या एकाच वेळी एकाच ठिकाणी रोजगार भरतीची प्रक्रिया राबवतात. यात कुठल्याही महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थी भाग घेऊ शकतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे पात्रता निकष व पगार वेगवेगळे असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About Campus Placement