esakal | ITI साठी यंदा मुबलक जागा; 15 जुलै पासून नोंदणी सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

ITI

ITI साठी यंदा मुबलक जागा; 15 जुलै पासून नोंदणी सुरु

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सरकारी अनुदानित आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मधील प्रवेशासाठी यंदा दीड लाख जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशाला अकरावी प्रमाणे सीईटी (CET) सारखी अट नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात या प्रवेशाला पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Abundant space ITI this year Registration starts 15 July say nawab malik)

त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील 417 शासकीय आणि 549 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (ITI) विविध ट्रेडच्या प्रवेशासाठी 15 जुलै पासून या प्रवेशाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, त्याची घोषणा राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी नुकतीच केली होती.

हेही वाचा: CET वेळापत्रकाबाबत शिक्षण मंडळाने दिली 'ही' महत्वाची माहिती

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील एकूण ९६७ आयटीआयमधील प्रवेशासाठी एकूण १ लाख ४९ हजार २९६ जागा उपलब्ध आहेत. विविध कोर्सेसच्या प्रवेशाच्या माहितीसाठी विद्यार्थ्यींनी https://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन संचालनालयाने केले आहे. आयटीआय (ITI) संस्थांमध्ये एकूण ९१ कोर्स उपलब्ध आहेत. यातील ८० कोर्सेससाठी दहावी उत्तीर्ण आणि ११ कोर्ससाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ही पात्रता आवश्यक आहे.

आयटीआयच्या उपलब्ध जागा

  • विभाग शासकीय खासगी एकूण

  • अमरावती १५,५९६ ३००८ १८,६०४

  • औरंगाबाद १५,०७६ ६१७२ २१,२४८

  • मुंबई १६,६५६ ३९९२ २०,६४८

  • नागपूर १४,२८८ १३,३७२ २७,६६०

  • नाशिक १४,८८८ १५,०५२ २९,९४०

  • पुणे १७,३१२ १३,८८४ ३१,१९६

loading image