esakal | CET वेळापत्रकाबाबत शिक्षण मंडळाने दिली 'ही' महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

CET वेळापत्रकाबाबत शिक्षण मंडळाने दिली 'ही' महत्वाची माहिती

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल (SSC Result) काल जाहीर झाल्याने अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या गाडीचे वेळापत्रक आणि त्यासाठी नियमावली (Timetable) येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार या सीईटीसाठी (CET) विद्यार्थ्यांना सुरुवातीला ऑनलाईन नोंदणीचा (online Registration) पर्याय तातडीने उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी दिली. (Eleventh Admission CET timetable and rules details declares in two days-nss91)

सीईटीच्या संदर्भात नियमावली आणि वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दोन दिवसाच्या आतच सीईटीसाठी चा जीआर जारी केला जाईल आणि त्याप्रमाणे अकरावीच्या प्रवेशाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले. सीईटीची परीक्षा राज्य शिक्षण मंडळाकडे असलेल्या प्रत्येक माध्यमांसाठी उपलब्ध असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचे माध्यम असेल त्या माध्यमातून परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या सीईटी परीक्षेत कोणतीही अडचण येणार नसल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. राज्यभरात या सीईटीचे ऑफलाइन पद्धतीने आयोजन केले जाणार असून,यासाठी राज्य शिक्षण मंडळ सोबतच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या दोन्ही संस्था परीक्षेचे नियोजन करणार आहेत.

हेही वाचा: ...अन्यथा 50 काेटींचा मानहानीचा दावा दाखल करु, भाजपचा इशारा

दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकटपणे उत्तीर्ण केल्यामुळे राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे, औरंगाबाद, नाशिक पिंपरी-चिंचवड, नागपूर आदी शहरांमध्ये असलेल्या नामवंत महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी रस्सीखेच होणार असून त्या पार्श्वभूमीवर अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र ही सीईटी न देताही अकरावीचे प्रवेश घेता येणार आहेत. मात्र ज्या ठिकाणी महाविद्यालयांची संख्या कमी असेल आणि विद्यार्थी संख्या जास्त असेल त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना सीईटीला सामोरे जावे लागणार आहे..

मुंबईत असे असेल चित्र

मुंबई आणि परिसरात असलेल्या 843 गणेश महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी 3 लाख 20 हजार 780 जागा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियासाठी होत्या त्यापैकी तब्बल 96 हजार 85 जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा काही नवीन महाविद्यालयाची भर पडणार असल्याने या जागांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे मुंबई आणि परिसरात अकरावीसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेशाच्या जागा उपलब्ध होणार आहेत. मात्र या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देणे आवश्यक आहे.

loading image