पदवी प्रवेशासाठी CET नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

B.Ed. Special examination will be conducted by CET candidates
B.Ed. Special examination will be conducted by CET candidates

मुंबई : यावर्षी बारावी परीक्षेचा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे. निकाल जास्त लागल्याने विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाल्याचं चित्र आहे. पण असं असलं तरी विद्यार्थ्यांना मात्र कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळेल याबाबतचं टेंशन आहे. सर्व विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा अधिक गुण मिळाल्यामुळे कट-ऑफ आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या कॉलेजमध्ये आणि हव्या त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार की नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. तसेच प्रवेशासाठी पुन्हा सीईटी होणार आहे का? हा देखील प्रश्न बाकी होता. मात्र, आता याबाबतचं स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.

दहावी बोर्डाची परीक्षा रद्द केल्याने अकरावी प्रवेशासाठी राज्य सरकारने स्वतंत्र सीईटी घेणार असल्याचे जाहीर केलंय. याच धर्तीवर बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने बीए, बीएससी, बीकॉम आणि इतर प्रवेशांसाठी सीईटी घेण्याबाबत विचार सुरू असल्याचं समजत होता. बारावीचा निकाल जाहीर होईपर्यंत उच्च शिक्षण विभागाकडून याबाबत स्पष्ट निर्णय येणं अपेक्षित होतं, त्यावर आता स्पष्टीकरण देण्यात आलंय.

B.Ed. Special examination will be conducted by CET candidates
नवा उच्चांक; सेन्सेक्सची पहिल्यांदाच ५४ हजारांपर्यंत मजल

12 वीच्या निकालावरच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवीला प्रवेश मिळणार आहे. या प्रवेशासाठी कसल्याही प्रकारची CET परीक्षा होणार नाहीये. नियमित व्यावसायिक अभ्यासक्रमांची CET होणार आहे. प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास प्राधान्य असणार आहे. जिल्हास्तरावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ही महाविद्यालये खुले करणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. थोडक्यात BA, BSc, Bcom साठी CET होणार नाही. या विद्यार्थ्यांना 12 वीच्या गुणांवरच प्रवेश मिळणार आहे.

यावेळी १२ वी परीक्षेचा निकाल जास्त लागला आहे. अंतर्गत मुल्यमापनामुळे गुणांवर फुगवटा आला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखा 99.83 टक्के आणि वाणिज्य शाखेचा 99.91 टक्के एवढा निकाल आहे. राज्यात 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com