esakal | NFC Exam : प्रवेश पत्र जारी, ८ जुलैला होणार परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

cet exam

NFC Exam : प्रवेश पत्र जारी, ८ जुलैला होणार परीक्षा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : अणू इंधन कॉम्प्लेक्स (NFC) ने स्टायपेंडीरी ट्रेनी आणि वर्क असिस्टंट / हॉस्पिटल वर्क असिस्टंट या पदांवर भरतीसाठी निवड प्रक्रियेचा भाग म्हणून फेज १ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे, त्यांनी आपले अॅडमिट कार्ड (admit card of NFC) एनएफसीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरून डाउनलोड करू शकतात. (admit card of NFC exam is out)

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

स्ट्राइपेंड्री ट्रेनी और वर्क असिस्टेंट/हॉस्पिटल वर्क असिस्टेंट स्टेज 1 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी एनएफसीच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला Rectruitment हा पर्याय दिसेल, तो निवडा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर अॅडमिट कार्ड हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आणखी एक नवे पेज ओपन होईल. त्यावर युजर नेम, पासवर्ड टाकून सबमीट करा. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमचं अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. इतकेच नाहीतर अॅडमिट कार्ड प्रिंटही करता येईल.

भारत सरकारच्या अणु उर्जा विभागाच्या न्यूक्लियर इंधन कॉम्प्लेक्स (एनएफसी) मधील स्टीपेंडीरी ट्रेनीच्या 273 पदांसाठी डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, कोरोना महामारीमुळे निवड प्रक्रियेअंतर्गत परीक्षेचा पहिला टप्पा आतापर्यंत होऊ शकला नाही. एनएफसीने नुकतीच 21 जून 2021 रोजी सूचना पाठवून विविध पदांच्या श्रेणी 1 आणि श्रेणी 2 पदांसाठी सुधारित परीक्षा तारखांची घोषणा केली होती. नोटीसनुसार, दोन्ही प्रवर्गांच्या परीक्षा जुलै महिन्यातच एका तासाच्या शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत.

loading image