esakal | निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास कार्यालयातच बेदम मारहाण; सहा आरोपींविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारशिवनी (जि. नागपूर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या (Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections) काळात पारशिवनी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्याला काँग्रेस नेत्याकडूनच मारहाण (Zilla Parishad member beaten) केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. दुधाराम सव्वालाखे मारहाण असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव (रा. वाहिटोला, ता. रामटेक ), रणवीर यादव, सचिन व अन्य तिघांविरुद्ध पारशिवनी पोलिसात गुन्हा दाखल (Filed a crime with the police) केला आहे. (Congress-member-beaten-in-the-the-election-time)

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पारशिवनी येथील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कार्यालयात दुपारी दोनच्या दरम्यान उमेदवार व काही कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते. रामटेक तालुक्यातील नगरधन जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे, बबलू बर्वे, प्रफुल कावळे, गोपाळ बुरडे यांच्यासह १५ कार्यकर्ते पक्ष कार्यालयात हजर होते.

हेही वाचा: पत्नी उच्चशिक्षित असेल तरीही पोटगी द्या : उच्च न्यायालय

थोड्या वेळापूर्वी राजेंद्र मुळक हे कार्यालयातून नागपूरसाठी निघून गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास काँग्रेस नेते उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव, भाऊ रणवीर यादव, सचिन व अन्य तीन जण पक्ष कार्यालयात आले. त्यावेळी दुधाराम सव्वालाखे यांनी साहेब नागपूर गये, असे उत्तर दिले. त्यावर गज्जू यादव यांनी शिवीगाळ करणे सुरू केले. नंतर गज्जू यादव व रणवीर यादव यांनी दुधाराम सव्वालाखे यांना मारण्यास सुरुवात केली, तसेच ठार मारण्याची धमकी दिली.

झालेल्या मारहाणीत दुधाराम सव्वालाखे यांच्या कपाळाला जबर मार लागला. त्यांच्या हाताला व मानेला गंभीर दुखापत झाली. यानंतर बबलू बर्वे समोर आले व त्यांनी दुधाराम सव्वालाखे याना बाजूस केले. नंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुधाराम सव्वालाखे यांना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांनी तक्रारीत घटनेबद्दल पारशिवनी पोलिसांना माहिती दिली. उपचारानंतर त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारशिवणी पोलिसांनी दुधाराम सव्वालाखे यांच्या तक्रारीवरून उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव, रणवीर यादव, सचिन व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: विदर्भ ते थेट लंडन, शेतकरी पुत्राची ६३ हजार विद्यार्थ्यांमधून निवड

मी व सरपंच नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी, सचिन खागर यांच्यासह माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना भेटण्यास पारशिवनीच्या पक्ष कार्यालयात गेलो होतो. पं.स.साठी निवडणुकीच्या संदर्भात ‘ए-बी’फार्म वाटपाबाबत मुळक यांची भेट घ्यायची होती. ऑफिसमध्ये बसलो असताना मागे बसून असलेल्या सव्वालाखे व माझ्या लहान भावात काही बाचाबाची होऊन झोंबाझोंबीत माझ्या भावाच्या हातातील अंगठी सव्वालाखेंच्या कपाळाला लागून जखम झाली. वेळीच मी मध्यस्थी करून वाद संपवला व तिथून निघून आलो. त्यानंतर माझ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठांकडून दबाव येत आहेत.
- उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव

(Congress-member-beaten-in-the-the-election-time)

loading image
go to top