Adolescent Depression : पौगंडावस्थेतील अस्वस्थता...

adolescent depression causes and treatment : पौगंडावस्थेतील नैराश्य व अस्वस्थतेमागे मेंदूतील रासायनिक बदल, कौटुंबिक ताण, अपयश व सामाजिक दबाव कारणीभूत ठरतात. वेळेवर समुपदेशन, उपचार, व्यायाम आणि पालक-शिक्षकांचा भावनिक आधार मिळाल्यास मुलांचे आयुष्य पुन्हा सकारात्मक होऊ शकते.
adolescent depression causes and treatment

adolescent depression causes and treatment

sakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

पौंगडावस्थेत अस्वस्थता निर्माण करणारं किंवा नैराश्य वाढवणारं मुख्य कारण मेंदूतील रासायनिक बदलात असतं. आनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस, परीक्षेतील अपयश, आई-वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, घरातील तणावाचे वातावरण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का या सर्वातून निर्माण होणारा ताण, एकतर्फी प्रेमातील अपयश, आयुष्यातील यशाबद्दलच्या चुकीच्या कल्पना, तसेच झपाट्याने बदलणारी सामाजिक परिस्थिती इत्यादींची नीट न होणारी उकल, भोवतालचा चंगळवाद आणि चांगले गुण मिळूनही अपेक्षित अभ्यासक्रमाला नाकारला गेलेला प्रवेश, नकारात्मक व्यक्तिमत्त्व, स्व-प्रतिमा क्षीण असणे व आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन, गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी, लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग व आघात यापैकी काहीही या आजाराला या वयात निमंत्रण देणारं ठरतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com