भारताबाहेर वैद्यकीय शिक्षण स्वस्त; अभ्यासक्रम, खर्च पाहून निवडा पर्याय : नीरज कुमार यांचा सल्ला

‘‘वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेत ७० ते ८० टक्के विद्यार्थी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात.
affordable education in abroad choose option after syllabus and expenses niraj kumar
affordable education in abroad choose option after syllabus and expenses niraj kumarsakal

Pune News : ‘‘वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेत ७० ते ८० टक्के विद्यार्थी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. परीक्षेत स्कोअर तुलनेने कमी आल्याने विद्यार्थ्यांनी निराश न होता भारताबाहेरील अन्य देशांमधील शिक्षणाचा पर्याय निवडावा. अनेक देशांमध्ये भारतापेक्षाही स्वस्तात वैद्यकीय शिक्षण मिळण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

भारताबाहेर वैद्यकीय अभ्यासक्रम निवडताना तेथील अभ्यासक्रम हा भारतीय वैद्यकीय अभ्यासक्रमाशी मिळता-जुळता आहे की नाही, याशिवाय शिक्षण शुल्क आणि अन्य खर्च, या गोष्टी आवर्जून पाहाव्यात,’’ असा कानमंत्र तज्ज्ञ नीरज कुमार यांनी विद्यार्थी-पालकांना दिला.

‘सकाळ विद्या’च्यावतीने आणि वे टू ॲडमिशन यांच्यामार्फत ‘भारतातील आणि भारताबाहेरील वैद्यकीय शिक्षण आणि त्याबद्दलचे मार्गदर्शन’ या विषयावर रविवारी चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्रात नीरज कुमार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ‘वे टू ॲडमिशन’चे संचालक अनुज सिंग, तज्ज्ञ धवल थेसिया, बिलेश सिंग, शंतनू शेखर, सुनील साह यांनी विद्यार्थी-पालकांच्या शंकांचे निरसन केले. नीरज कुमार म्हणाले, ‘‘देशातील २६ लाख विद्यार्थ्यांनी यंदा नीट परीक्षा दिली आहे.

त्यातील जवळपास ८० ते ७० टक्के विद्यार्थी नीटच्या परीक्षेत यश मिळावे, चांगला स्कोअर व्हावा, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मेहनत घेत असतात. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळावा, असे प्रत्येक परीक्षार्थीला वाटते. परंतु, सरकारी महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालये मिळून देशात प्रवेशासाठी एक लाख जागा आहेत.

त्यामुळे नीट परीक्षेत अपेक्षित स्कोअर आला नाही, तरीही वैद्यकीय अभ्यासक्रम कसा करता येईल, यासाठी परदेशातील वैद्यकीय शिक्षणाकडे पालकांनी वळावे. त्याचबरोबर पॅरामेडिकल क्षेत्रातील अभ्यासक्रम पालकांना निवडता येतील. आणखी चांगला अभ्यास करून पुन्हा एकदा ‘नीट’ची परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहे.’’

वैद्यकीय शिक्षणातील आर्थिक बाजू मांडताना नीरज कुमार म्हणाले, ‘‘नीट परीक्षा देणाऱ्या ९० टक्के विद्यार्थ्यांचे प्राधान्य ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमाला असते. सरकारी महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी ७००च्या पुढे स्कोअर असणे आवश्यक असते. म्हणूनच ‘एमबीबीएस’च्या खालोखाल दंतवैद्यकीय, पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे पर्याय निवडले जातात.

‘नीट’मध्ये चांगला स्कोअर आला नाही, तर अभिमत आणि खासगी विद्यापीठांमधील वैद्यकीय महाविद्यालयांचे पर्याय खुले आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत ‘एमबीबीएस’ करण्यासाठी साधारणत: एक ते दीड कोटी रुपये खर्च येतो. त्या तुलनेत भारताबाहेर वैद्यकीय शिक्षणासाठी साधारणत: २५ ते ६० लाख रुपये खर्च येतो,’’

नेपाळमधील वैद्यकीय शिक्षणाबद्दल नीरज कुमार म्हणाले, ‘‘नेपाळ हा भारताजवळील देश आहे. या देशात ये-जा करणे अन्य देशांच्या तुलनेत सोईस्कर आणि सहज शक्य आहे. नेपाळमधील संस्कृती, अन्न हे आपल्याशी मिळतेजुळते आहे.

विद्यार्थ्यांसह पालकदेखील स्वत: जाऊन महाविद्यालय पाहून शकतात. याशिवाय येथील वैद्यकीय शिक्षण हे भारतीय वैद्यकीय अभ्यासक्रमाशी ९० टक्के साधर्म्य असणारे आहे. अर्थात, भारताजवळील हा एकदम सोईस्कर पर्याय असल्याने अन्य देशांच्या तुलनेत आणि तरीही भारतापेक्षाही स्वस्त वैद्यकीय शिक्षण येथे उपलब्ध आहे.’’

चर्चासत्राच्या उत्तरार्धात झालेल्या प्रश्‍नोत्तरात विद्यार्थी, पालकांच्या शंकांचे तज्ज्ञांनी निरसन केले. त्यानंतर विविध देशांमधील वैद्यकीय शिक्षणाबद्दल माहिती देणाऱ्या दालनामध्ये विद्यार्थी-पालकांनी मार्गदर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले.

वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत अधिक माहितीसाठी ‘वे टू ॲडमिशन’ला ९७५००००१११ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

‘वैद्यकीय’ला अन्य पर्याय

पॅरामेडिकल अभ्यासक्रम : फिजिओथेरपी, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, कार्डिओ टेक्निशियन, न्युरो टेक्निशियन, रेडिओ थेरपी टेक्निशियन

बी.ए./बी.एस्सी सायकॉलॉजी, ऑडिओ- स्पीच थेरपी, बी.एस्सी हेल्थ सायन्स/मेडिसीन/हेल्थ टेक्नॉलॉजी

परदेशात येणारा खर्च

देशाचे नाव -अंदाजे खर्च

  • रशिया- २५ ते ३५ लाख रुपये

  • चीन -२५ ते ४० लाख रुपये

  • नेपाळ- ४० ते ६० लाख रुपये

  • कझाकस्तान, किर्गिजस्तान- ३० ते ३५ लाख रुपये

  • अमेरिकेजवळील देश -७५ ते ९० लाख रुपये

देशातील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च

  • सरकारी महाविद्यालये -३.७५ ते १० लाख रुपये

  • अभिमत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये -१८ ते २० लाख रुपये

  • खासगी महाविद्यालये - ७५ लाख ते १.५ कोटी रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com