B.Com Career Opportunities : बी.कॉम. नंतर फक्त नोकरी नाही, व्यवसायाचंही स्वप्न पूर्ण करा!

Job and business opportunities after B.Com : जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणांमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळे वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
Job and business opportunities after B.Com
Job and business opportunities after B.ComSakal
Updated on

Job and business opportunities : जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणांमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळे वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढले आहे. यामुळे विविध स्तरांवरील नोकरीच्या संधी निर्माण होत असून, कुशल मनुष्यबळाची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

सामान्यतः वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांचा कल बी.कॉम. (पदवी) शिक्षणाशिवाय कंपनी सेक्रेटरी (सीएस), चार्टड अकाउंटंट (सीए), कॉस्ट अकाउंटंट (आयसीडब्ल्यूए), कायदा (लॉ), स्पर्धा परीक्षा (युपीएससी, एमपीएससी) या शिक्षणाकडे असते. परंतु ज्यांना शास्त्रशाखेतील विषयांची आवड नाही किंवा ४५ टक्केपेक्षा अधिक गुण नाहीत असे अनेक विद्यार्थी वाणिज्य शिक्षणास प्राधान्य देत असतात.

परंतु विद्यमान परिस्थितीत या दृष्टिकोनात मोठा बदल झालेला असून कॉमर्स विद्याशाखेतील उत्तम संधी या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागलेले आहे. कारण बहुव्यापक असणाऱ्या या शाखेतील विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या दृष्टीने आवश्‍यक असणारे मार्केटिंग, फायनान्स, व्यवस्थापन, एचआर, करिअर, अकाउंट्‌स, ऑडिट, बिझनेस टॅक्‍सेशन, व्यापारी कपडे, कम्युनिकेशन, कॉस्टिंग या सर्व बाबींचा समावेश या बहुव्यापक शाखेत होत असल्याने सर्वसाधारण कारकीर्द करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. परिणामी भावी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. वरील पारंपरिक अभ्यासक्रमांशिवाय या विद्यार्थ्यांना खालील कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. 

बीबीए अभ्यासक्रम 

पारंपरिक कॉमर्स शाखेतील शिक्षणाबरोबरच बीबीए, बीबीए (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन), बीबीए (आयबी) हे पदविका अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य विद्याशाखेअंतर्गत सुरू केले आहेत. व्यावसायिक जगातील प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. 

बारावी उत्तीर्ण असलेल्या कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी पात्र होऊ शकतो. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आदेशानुसार बीबीए, बीबीए (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन), बीबीए (आयबी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालय स्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) विद्यार्थ्याला द्यावी लागते. 

१) बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस  ऍडमिनिस्ट्रेशन) 
कालावधी - तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम 
वैशिष्ट्ये - व्यावसायिकदृष्ट्या व्यवस्थापकीय कलाकौशल्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाच्या विषयांची रचना. 
 प्रात्यक्षिक ज्ञानाच्या दृष्टीने कार्यशाळा, उद्योग जगतातील नामवंत कंपन्यांच्या भेटी, चर्चासत्रे, प्रोजेक्‍ट प्रेझेंटेशन (सादरीकरण) आदी उपक्रमांद्वारे प्रशिक्षण. 
 युवा सप्ताह व सामाजिक सप्ताहाच्या आयोजनाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. 

२) बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन- कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) 
कालावधी - तीन वर्षे 
वैशिष्ट्ये - व्यावसायिक जगतासाठी उपयुक्त पदविका अभ्यासक्रम 
 माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर व्यवस्थापनशास्त्र या उपयुक्त विषयांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश 
 कार्यशाळा, कॉम्प्युटर प्रात्यक्षिके, थिअरी, चर्चासत्रांचा समावेश 
 मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध 

३) बीबीए (आयबी) (बॅचलर ऑफ बिझनेस
     ऍडमिनिस्ट्रेशन - इंटरनॅशनल बिझनेस) 
कालावधी - तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम 
वैशिष्ट्ये - आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्तसंस्था, लेखापरीक्षण, जागतिक विपणन व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय भाषा या विषयांचा समावेश 
 आयात - निर्यात विभागात संधी 

Job and business opportunities after B.Com
Maharashtra 12th Result 2025: मुली ठरल्या वरचढ पण बारावीचा निकाल घसरला, एका क्लिकवर जाणून घ्या रिझल्टची संपूर्ण वैशिष्ट्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com