Education News : कोरोनानंतर मोबाईलच्या नादात विद्यार्थी झाले स्लो, नीट-जेईईसाठी शिक्षकांना घ्यावी लागतेय अधिकची मेहनत

Education News : कोरोनामध्ये लागलेल्या मोबाइलच्या सवयीमुळे विद्यार्थी ‘स्लो’ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Education News
Education Newsesakal

Education News : विद्यार्थ्यांमध्ये आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी ‘नीट’ची तयारी जोरात सुरू आहे. कोरोना वगळता परीक्षेचा पॅटर्न बदलला नसला तरी अभ्यास करीत असताना विद्यार्थ्यांना कोरोना काळाचा फटका अद्यापही बसतो आहे. कोरोनामध्ये लागलेल्या मोबाइलच्या सवयीमुळे विद्यार्थी ‘स्लो’ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

देशभरात २०२० पासून २०२२ पर्यंत कोरोनामुळे विद्यार्थी मोबाइलवरून शिक्षण घेऊ लागले. रोज ऑनलाइन क्लासेसमुळे सातत्याने मोबाइलवर राहण्याची सवय लागली. स्वतः विचार करण्याची शक्ती व पुस्तके वाचण्याची सवय आणि अभ्यासाचे तासही कमी झाले. साधारणतः वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’चा अभ्यास करताना किमान पाच ते सहा तास अभ्यास आवश्‍यक असतो.

शिवाय त्यासाठी लागणारी एकाग्रता हेही महत्त्वाचे असते. मात्र, मोबाइलमधील व्हिडिओ बघण्याच्या सवयीमुळे त्यांची ती सवय कमी झाली. शिवाय सेल्फस्टडीकडेही विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

Education News
MPSC News : निकाल रखडल्याने विद्यार्थी संभ्रमात ; कर सहाय्यक, लिपिक पदाची परीक्षा होऊन उलटले चार महिने

अनेक विद्यार्थी अभ्यास करताना एकाग्र होत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात जे विद्यार्थी ऑनलाइन क्लासेस करून पुढच्या वर्गात गेले त्यांना मिळालेल्या गुणांचा प्रभाव आणि मोबाइलचा अतिवापर यामुळे ‘नीट’चा अभ्यास करताना त्या वर्षांतील अभ्यासक्रम पुन्हा ‘रिवाईज’ करावा लागतो आहे.

जेईईच्या तुलनेत ‘नीट’सोडविताना वेळ कमी आणि प्रश्‍न जास्त असल्याने उत्तर पटकन लक्षात येणे आवश्‍यक असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेताना अधिकची मेहनत घ्यावी लागत आहे, असे शिक्षक सांगत आहेत.

अभ्यास करताना लागणारी एकाग्रता ही मध्ये येणाऱ्या डिस्ट्रक्शनमुळे संपत चालली आहे. त्याला आजार म्हणता येणार नसून ती कोरानानंतर जडलेली सवय आहे. त्यामुळे विद्यार्थिही आता एकाग्रपणे १० ते १५ मिनिटाच्या वर अभ्यास करताना दिसत नाही. यामुळे मुलांना आता मोबाइलपासून दूर नेणे, शिस्त लावणे हा प्रकार झाल्यास त्यांच्याकडून प्रतिकार होताना दिसून येतो.

डॉ. संदीप सिसोदिया, मानसोपचार समुपदेशक

Education News
Right To Education News : आरटीई प्रवेशाचे नियम बदलल्याने आकर्षण घटणार! पालकांमध्ये नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com