अग्नीवीर भरती प्रकियेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agniveer Recruitment result

राहुरी येथे पार पडलेल्या 'अग्नीवीर भरती' मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Agniveer Result : अग्नीवीर भरती प्रकियेचा निकाल जाहीर

पुणे - भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवीर भरतीसाठी नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या 'अग्नीवीर भरती' मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी पुणे क्षेत्रीय भरती कार्यालयात २६ नोव्हेंबरपर्यंत हजर होऊन कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क, स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती मेळाव्यामध्ये पुण्यासह नगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती भरती क्षेत्रीय कार्यालय पुणेचे संचालक मनिष कर्की यांनी दिली.

संकेतस्थळ - https://joinindianarmy.nic.in

टॅग्स :puneRecruitmentResult