मोठं संकट! 'या' कंपनीचा कामगारांना जबर फटका; 90 दिवसांत नवी नोकरी शोधण्याचा आदेश Walmart Layoffs | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Walmart Layoffs

Amazon, Neiman Marcus आणि Lidl सारख्या कंपन्यांनी त्यांचे कॉर्पोरेट कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कमी केले आहेत.

Walmart Layoffs : मोठं संकट! 'या' कंपनीचा कामगारांना जबर फटका; 90 दिवसांत नवी नोकरी शोधण्याचा आदेश

Walmart Layoffs : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेरिकन कंपनी (American Company) वॉलमार्टनं कामगारांना 90 दिवसांच्या आत नवीन नोकऱ्या शोधण्यास सांगितलंय. कंपनीच्या प्रवक्त्यानं याला दुजोरा दिलाय.

पॅड्रेकटाऊन, न्यू जर्सी येथील सुमारे 200 कामगार आणि फोर्ट वर्थ टेक्सास, चिनो कॅलिफोर्निया, डेव्हनपोर्ट फ्लोरिडा आणि बेथलेहेम पेनसिल्व्हेनिया येथील शेकडो कामगारांना शनिवार व रविवारच्या शिफ्टमध्ये कपात केल्यामुळं टाळेबंदीचा सामना करावा लागला, असं प्रवक्त्यानं सांगितलं.

वॉल-मार्टच्या या निर्णयामुळं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत उलथापालथ होऊ शकते. या वर्षी अर्थव्यवस्थेला मंदीचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलाय. चॅलेंजर, ग्रे आणि ख्रिसमसच्या मार्चच्या अहवालानुसार, आगामी मंदीच्या भीतीनं अनेक कंपन्यांनी 2023 मध्ये आतापर्यंत 17,456 नोकऱ्या कमी केल्या आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत केवळ 761 जणांच्या नोकऱ्या गेल्या होत्या.

Amazon, Neiman Marcus आणि Lidl सारख्या कंपन्यांनी त्यांचे कॉर्पोरेट कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कमी केले आहेत. वॉलमार्टनं एका निवेदनात म्हटलंय, "ग्राहकांच्या भविष्यातील गरजांसाठी चांगल्या प्रकारे तयारी करण्याच्या उद्देशानं आम्ही अलीकडंच मानव संसाधनांच्या संख्येत बदल केले आहेत. आम्ही प्रभावित सहयोगींना नवीन नोकऱ्या शोधण्यात मदत करणार आहोत."

प्रवक्त्यानं सांगितलं की, ते प्रभावित कामगारांना जॉलिएट, इलिनॉय आणि लँकेस्टर, टेक्साससह इतर कंपनी शाखांमध्ये नोकऱ्या शोधण्यासाठी 90 दिवसांपर्यंत पैसे देईल. कंपनीनं या ठिकाणी हाय-टेक ई-कॉमर्स वितरण केंद्रं उघडली आहेत. वॉलमार्ट गेल्या काही वर्षांपासून ऑटोमेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन (CEO Doug McMillon) यांनी सांगितलं की, 'कंपनी या वर्षी $15 अब्जपेक्षा जास्त भांडवली खर्चाच्या बजेटचा भाग म्हणून ऑटोमेशन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक वाढवण्याची योजना आखत आहे.'

टॅग्स :americaJob NewsNew Job