Job Loss | जगभरात कर्मचारीकपात; मात्र भारतीय लोक स्वेच्छेने सोडतायत नोकऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job Loss

Job Loss : जगभरात कर्मचारीकपात; मात्र भारतीय लोक स्वेच्छेने सोडतायत नोकऱ्या

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना काढून टाकत आहेत, उलट भारतात अनेक आयटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या सोडत आहेत. पण त्यामागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का ?

दररोज आपण कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या बातम्या ऐकत असतो, ज्यांचे आकडे आपल्याला विचार करायला लावतात, परंतु देशातील आयटी क्षेत्रातील परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी आहे. देशातील आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांची घटती संख्या दिग्गजांच्या चिंतेचे कारण आहे.

एका अहवालानुसार, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन क्षेत्रात नोकरी सोडणाऱ्या व्यावसायिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे.

हेही वाचा: Recession : मंदीच्या सावटातही टेलिकॉम, ऑटोमेशन क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये वाढ

२२ लाख कर्मचारी नोकरी सोडू शकतात

एका अहवालात असे म्हटले आहे की 2025 पर्यंत, 22 लाख आयटी व्यावसायिक नोकरी सोडू शकतात आणि 55 टक्के व्यावसायिक आयटी क्षेत्रात परत येणार नाहीत. येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा हा आहे की भारतातील आयटी व्यावसायिक त्यांच्या स्वेच्छेने नोकरी सोडत आहेत आणि त्यांना काढून टाकले जात नाही.

स्वेच्छेने नोकरी सोडण्याच्या या प्रक्रियेला अट्रिशन म्हणतात. जर आपण गेल्या दशकाबद्दल बोललो, तर भारतीय आयटी क्षेत्राने गेल्या दशकात उत्कृष्ट वाढ पाहिली आहे. आयटी क्षेत्राने 15.5 टक्के वाढ नोंदवली आहे आणि या आर्थिक वर्ष 2022 मध्येच 5.5 लाख रोजगार निर्माण केले आहेत.

पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, जेव्हा आयटी क्षेत्रात खूप संधी आहेत आणि जगभरात मंदी येत असताना भारतीय आयटी व्यावसायिक त्यांच्या नोकऱ्या का सोडत आहेत ?

हेही वाचा: Job Loss : मेटा आणि मायक्रोसॉफ्टनंतर आता अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

या कारणांमुळे नोकरी सोडतात

सध्याच्या काळात कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि आवडीनिवडी दोन्ही बदलल्या आहेत. आता कर्मचारी त्यांच्या कामातील लवचिकता तसेच करिअरच्या वाढीसारख्या पैलूंवर आधारित त्यांच्या करिअरची पुनर्तपासणी करत आहेत. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या कंपनीत या सुविधा मिळत नसल्यास ते नोकरी सोडत आहेत.

१. - IT क्षेत्रात काम करणार्‍या 50% लोकांचे म्हणणे आहे की, IT क्षेत्रातील कर्मचारी चांगली मोबदला आणि लाभ नसल्यामुळे नोकरी सोडत आहेत.

२. - दुसरीकडे, 25 टक्के लोक म्हणतात की करिअरमध्ये प्रगती न होणे हे नोकरी सोडण्याचे मुख्य कारण आहे.

३. तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांनी संस्थेत भरती करताना कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामात असे वाटले की त्याला महत्त्व दिले जाते आणि त्याच्या कामाचे कौतुक केले जाते, तर तो नक्कीच काम करेल.

टॅग्स :Recession