esakal | इंजिनिअरिंगसाठी बेस्ट अमृता विश्व विद्यापीठ
sakal

बोलून बातमी शोधा

इंजिनिअरिंगसाठी बेस्ट अमृता विश्व विद्यापीठ

देशातच नव्हे तर जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल चिंता लागून राहिली आहे.

इंजिनिअरिंगसाठी बेस्ट अमृता विश्व विद्यापीठ

sakal_logo
By
जाहिरात

सध्या कोरोनाच्या या संकट काळात अमृता विश्व विद्यापीठाने कॅम्पस प्लेसमेंटसाठी प्रयत्न केले आहेत. अमृता विश्व विद्यापीठम हे खास अशा अभ्यासक्रमासाठी आणि शैक्षणिक म्यूल्यांसाठी ओळखलं जातं. विशेषत; इथल्या अत्याधुनिक अशा संशोधन सुविधा ही वेगळी ओळख आहे. वेगवेगळ्या कंपन्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी बोलावलं. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शक्य तितक्या चांगल्या संधी पुरवल्या जात आहेत. स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या संपूर्ण बॅचसाठी व्हर्च्युअल इंटरव्ह्यू घेतले गेले. त्यामुळे कंपन्यांसह विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सोपी झाली. देशातच नव्हे तर जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल चिंता लागून राहिली आहे.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना संधी मिळवून देण्याचं आणि स्वत:च्या पायावर उभा राहण्याचं बळ अमृता विद्यापीठाकडून दिलं जात आहे.

अमृता विद्यापीठात सध्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसलं तरी यामुळे शैक्षणिक कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी विद्यापीठाने केली होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही. त्याचाच परिपाक म्हणजे अमृता विद्यापीठाने भारतातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत मिळून प्लेसमेंट मोहिम ऑनलाइन पद्धतीने राबवली.

2020 मध्ये व्हर्च्युअल प्लेसमेंटच्या माध्यमातू अमृता विद्यापीठातील बी टेक, एमटेकच्या 90 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेल्या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, सिस्को यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांता समावेश होता. विद्यापीठाच्या 2020 मधील जॉब सर्चची सुरुवात ही अमेरिकेतील सिस्को या बहुराष्ट्रीय कंपनीपासूनच झाली.

ऑनलाइन भरतीमध्ये जवळपास 50 कंपन्यांनी इंटर्नशिप पासून वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात आली. त्यात 60 हजार रुपये प्रति महिना ते 14.37 लाख रुपये वार्षिक अशा पॅकेजेसच्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना मिळाल्या. यात एका ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय कंपनीने सर्वाधिक 56.9 लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे.

अमृता विश्व विद्यापीठमचं शिक्षण हे अशा अभ्यासक्रमावर आहे जो व्हॅल्यू बेस शिक्षणाला आणखी मजबूत करतो. संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होतात. एकात्मिक अभ्यास, दुहेरी पदवी प्रोग्रॅम यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होतो.

याशिवाय, शैक्षणिक सहभागासाठी विद्यापीठाकडून शाश्वत अशा समुदायांच्या विकासावर भर दिला जातो. अनुभवावर आधारित शिक्षण देणारा अभ्यासक्रम यासाठी तयार करण्यात आला आहे. जिथं सुरक्षा नाही अशा ठिकाणी आणि ग्रामीण भागातील प्रश्न सोडवणारी टिकाऊ आणि सहज साध्य अशा प्रकारची व्यवस्था तयार करता येईल असं ज्ञान, कौशल्ये या विद्यार्थ्यांनी विकसित करतील असा विश्वास विद्यापीठाकडून व्यक्त केला जातो. एचटी, लिव्ह इन लॅब यांसारख्या कार्यक्रमातून विद्यार्थी त्यांचे कौशल्य वापरू शकतात. एचटी ही संस्था इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. समजातील समस्या सोडवण्यासाठी संस्थेकडून रोबोटचा वापर केला जातो.

विद्यार्थ्यांना नावनोंदणी सुलभ व्हावी यासाठी अमृता विद्यापीठाने यंदा आपली लवचिक प्रवेश तंत्र जाहीर केले. अमृता प्रवेश परीक्षा (एईईई), रिमोट प्रॉक्टर्ड परीक्षा (सीबीटी किंवा आरपीई), जेईई मेन्स 2021, किंवा एसएटी किंवा पीअरसन यूजी प्रवेश परीक्षा (पीईयूई) स्कोअर ही अमृता स्वीकारलेल्या प्रवेश परीक्षा आहेत. आणखी तीन प्रवेश प्रवेशाच्या शक्यतांमुळे, अमृता येथील विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश करण्याची संधी चांगली आहे.

अमृता विद्यापीठाने यावेळी प्रवेश प्रक्रिया जाहीर करताना ती विद्यार्थ्यांना सहज आणि सोपी राहील यासाठी प्रयत्न केला आहे. Amrita Entrance Examination (AEEE), Remote Proctored Examination (CBT or RPE), JEE Mains 2021, SAT किंवा Pearson UG Entrance Examination (PUEE) यामधील गुण अमृता विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातील. तीन आणखी प्रवेश परीक्षांचा पर्याय असल्यानं विद्यापीठात प्रवेश मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. प्रवेश प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आणि सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.

अमृता विद्यापीठ हे एज्युकेशन फॉर लाइफ अँड एज्युकेशन फॉर लिव्हिंग यावर विश्वास ठेवते. इथे शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी हे समजातील समस्या सोडवणारे असतील. समाज आणि मानवजातीच्या कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी करतील असा आमचा विश्वास असल्याचं अध्यक्ष महेश्वरा चैतन्य यांनी म्हटलं.

loading image
go to top