esakal | पुस्तकाच्या स्पीड रीडिंगची तंत्रे
sakal

बोलून बातमी शोधा

reading

आजच्या लेखात, आम्ही वेगाने वाचन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या पद्धती आणि तंत्रांवर लक्ष केंद्रित करू. एक महत्त्वाचा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा, वेगवान वाचन ही मेंदूला वेगाने सामग्री वाचण्यासाठी प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया आहे. 

पुस्तकाच्या स्पीड रीडिंगची तंत्रे

sakal_logo
By
आनंद महाजन/मोनिता महाजन

जगातील यशस्वी लोकांमधील एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचतात. आपल्याला माहीत आहे की, शारीरिक विकासासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे वाचनाचे कार्य मनाच्या विकासासाठी आवश्‍यक आहे. मागील लेखात आपण स्पीड रीडिंगच्या फायद्यांविषयी चर्चा केली होती. 

आजच्या लेखात, आम्ही वेगाने वाचन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या पद्धती आणि तंत्रांवर लक्ष केंद्रित करू. एक महत्त्वाचा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा, वेगवान वाचन ही मेंदूला वेगाने सामग्री वाचण्यासाठी प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- वाचताना आपल्या शरीरास योग्य स्थितीत ठेवा. सरळ खुर्चीवर बसा. आपले पाय जमिनीवर ठेवा. 
- पुस्तक आपल्यासमोर कलत्या स्थितीत (तिरपे) धरा. 
- आपला चेहरा आणि पुस्तकाच्या दरम्यान किमान दीड फूट अंतर असावे. 
- पुस्तक अगदी जवळ धरू नका. 

दररोज एकाच वेळी वाचण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी योग्य ती वेळ निवडा आणि दररोज त्याच वेळी सुमारे १५ मिनिटांसाठी वाचन करावे. 
- वाचनाच्या वेळेची मर्यादा निश्‍चित करा. यासाठी घड्याळ, डिजिटल घड्याळ किंवा स्टॉप वॉच वापरा. 
- योग्य लक्ष्य निश्‍चित करा. एका तासात एका धड्याचे दोन किंवा तीन विभाग वाचण्याचे लक्ष्य ठेवा. कमी वेळेत सामग्री वाचायचा करण्याचा प्रयत्न करा. 
- पुस्तक आपल्या जवळ ठेवा जेणेकरून नोट्स घेऊ किंवा विशेष शब्द लिहू शकता. 
- तणावग्रस्त मनाने वाचू नका. एकाग्रतेने वाचन करण्याचा प्रयत्न करा. 
- आरामदायक वेगापेक्षा किंचित वेगाने वाचा. 
- आपण आपल्या सामान्य वेगापेक्षा थोडा वेगवान वाचन करत असल्याचा अनुभव घ्या. परंतु तरीही करत असलेले वाचन समजून घेतले पाहिजे. 
- डोळे जलद हलवा. आपले डोळे एकाच वेळी शब्दांच्या समूहात वाचतात (सहसा तीन) 
- शब्दांचे गट एकाच वेळी तीन ते सहापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करा. मार्गदर्शक म्हणून पेन्सिल किंवा आपले पॉइंटर बोट वापरा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकलन तपासा 
- आकलन होत नसल्यास वाचनाचा वेग वाढवून फायदा नाही. 
- वेगाने वाचताना ७०-८० टक्क्यांपर्यंत समजते. 
- आकलन जास्त असल्यास कदाचित त्यापेक्षा अधिक वेगाने वाचू शकतो 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

साहित्य वाचता तेव्हा स्वत:साठी प्रश्‍न तयार करा. उदाहरणार्थ, ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका’ असे वाचन करताना ‘स्वातंत्र्य चळवळीतील सर्व स्त्रिया कोण होत्या, त्यांनी काय केले व कसे कार्य केले?’ 
- मनात नोट्स बनवायला शिका. जे शिकलात ते मोठ्याने म्हणा. आपल्या लक्षात काय राहिले आहे, हे तपासण्यासाठी आपल्या नोट्स किंवा मजकूर न पाहता बोलण्याचा प्रयत्न करा. 
एकदा आपण या तंत्रांची अंमलबजावणी केल्यास आपल्या वाचनाची गती, एकाग्रता आणि आकलनशक्ती वाढली आहे असे आपल्याला आढळेल.