सकारात्मक विचारांची किमया 

आनंद महाजन 
Thursday, 16 April 2020

आयुष्यात  ध्येय साकार करणे नक्कीच शक्‍य आहे, या सगळ्या गोष्टी साकार करण्यासाठी आपले मन खंबीर असणे महत्त्वाचे आहे. ध्येय प्राप्तीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे जीवनात आत्मसात करणे गरजेचे आहे.

आपल्या वेगवान जीवनशैलीमध्ये आपल्याला खूप लवकर आणि खूप उंच भरारी घ्यायची आहे. त्यासाठी दिवसभरातले २४ तासही कमी पडतात असे सतत जाणवत असते. ‘मला खूप मोठं व्हायचं आहे. मला आयुष्यात सर्व सुखसोयी पुरेपूर उपभोगायच्या आहे,’ हे वाक्‍य नेहमीच प्रत्येक महत्त्वाकांक्षी व्यक्तीच्या मनात सतत स्वगत करत असतात. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे सगळे प्राप्त करण्याचा मार्ग आपण सतत शोधत असतो आणि त्याचा उलघडा आपल्या अनुभवाच्या कोशात जमा होत असतो. 

प्रत्येकाला वाटते... 
१) मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. 
२) माझ्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे. 
३) माझ्या कामगिरीचा मोबदला नक्कीच मिळाला पाहिजे. 
आयुष्यात हे सर्व ध्येय साकार करणे नक्कीच शक्‍य आहे, या सगळ्या गोष्टी साकार करण्यासाठी आपले मन खंबीर असणे महत्त्वाचे आहे. 

ध्येय प्राप्तीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे जीवनात आत्मसात करणे गरजेचे आहे. 
१) चांगल्या सवयी गरजेच्या आहेत. चांगल्या सवयी आत्मसात केल्यास मुलांना त्यांच्या अभ्यासात आणि गुणवत्तेमध्ये फायदा होतो. तसेच बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर चांगले परिणाम होतात. 

२) आपण व्यावसायिक आणि सामाजिक स्तरावर खूप लोकांना भेटत असतो. प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तींमध्ये चांगले गुण ओळखावे आणि ते गुण आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा. संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या चांगल्या गुणांचे नेहमी कौतुक करावे. यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. ही सकारात्मकता आपल्याला ध्येयाजवळ नेण्यास पूरक ठरते. 

३) रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात किती निर्णय (छोटे किंवा मोठे) घेतले याचा आढावा घ्यावा. हे निर्णय काही वेगळ्या पद्धतीने घेतला आले असते का, याचा विचार करावा. याला ‘STRIKE RATE OF DECISIOW MAKING’ असे म्हटले जाते. 

४) कठोर मेहनत आणि परिश्रमाला पर्याय नाही. ते परिश्रम स्मार्ट आणि क्रिएटिव्ह पद्धतीने केल्यास त्या नावीन्याला नक्कीच सगळे प्रतिसाद आणि पाठिंबा देतात. कल्पकता वापरल्यामुळे आपल्या शरीरात नवचेतना जागृत होते. 

५) आपल्याकडे अफाट कार्य क्षमता आहे, याचा दृढ आत्मविश्‍वास ठेवावा. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी आत्मविश्‍वासाने आपल्या ध्येयाच्या पूर्ततेचा दावा करावा आणि त्या यशाचे मनात सकारात्मक चित्रीकरण करावे. यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते आणि आपला सकारात्मक दृष्टीकोन आपल्या कामात आणि वागण्यात झळकायला लागतो. 

६) ‘नाही’ हा शब्द आपल्या आयुष्याच्या शब्दकोशातून काढून टाका. 

ALL THE BEST!!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anand mahajan positive thoughts article