पशुवैद्यक व्हायचंय?

माणूस सोडून उर्वरित प्राण्यांचा वैद्य बनायचे असेल तर पशुवैद्यकी विज्ञान पदवी (B.V.Sc.) हा साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर आहे. यामध्ये पाळीव प्राणी आणि जंगली अशा दोन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजातींचा समावेश आहे.
animals get sick and need treatment and care Veterinary medicine such branch of science know details
animals get sick and need treatment and care Veterinary medicine such branch of science know details sakal
Updated on

- डॉ. मिलिंद नाईक

माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आजारी पडतात आणि त्यांनाही औषधोपचार व देखभालीची आवश्यकता असते. पशुवैद्यकीय चिकित्सा ही विज्ञानाची अशी शाखा आहे, जी मानवेतर प्राण्यांमधील रोग, विकार आणि इजा यांचा प्रतिबंध, व्यवस्थापन, निदान आणि उपचारांचे प्रशिक्षण देते.

माणूस सोडून उर्वरित प्राण्यांचा वैद्य बनायचे असेल तर पशुवैद्यकी विज्ञान पदवी (B.V.Sc.) हा साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर आहे. यामध्ये पाळीव प्राणी आणि जंगली अशा दोन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजातींचा समावेश आहे.

मानव वैद्यकशास्त्रात जसे विषय असतात, त्याप्रमाणे पशुवैद्यकीय शास्त्रातसुद्धा शरीरशास्त्र (ॲनॅटॉमी), शरीरक्रिया (फिजिओलॉजी), शल्यचिकित्सा (सर्जरी), औषधशास्त्र (फार्माकोलॉजी), रोगनिदानशास्त्र (पॅथॉलॉजी) असे विषय असतात आणि मानव वैद्यकशास्त्राप्रमाणेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी (M.V.Sc.) करता येते आणि तुम्ही त्या त्या विषयामध्ये विशेष तज्ज्ञ बनू शकता. जसे की, चिकित्सक, शल्यचिकित्सक, रोगनिदान, आहार व पोषण, अनुवंशशास्त्र, डोळ्यांचे तज्ज्ञ वगैरे.

गरज

पशुवैद्यकीय चिकित्सकांची अनेक ठिकाणी गरज असते, जसे पाळीव प्राण्यांचे अथवा वन्यप्राण्यांचे दवाखाने, औषधनिर्माण कारखाने, संशोधन संस्था, पशुपालन व उत्पादन संस्था इत्यादी. शहरी व ग्रामीण भागात कुत्रा, मांजर, पक्षी असे प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढल्याने दवाखान्यांची आवश्यकता वाढली आहे.

राखीव जंगले आणि अभयारण्ये, प्राणी संग्रहालये यांची जबाबदारी सरकारने घेतल्याने तिथेही प्राण्यांची संख्या वाढून वैद्यांची गरज वाढली आहे. मानवासाठी तयार करण्यात आलेल्या कोणत्याही औषधाची तपासणी सर्वप्रथम प्राण्यांवर होते. त्यामुळे औषध निर्माण कारखान्यामधे पशुवैद्यकांची गरज पडते. काही रोग हे प्राण्यांमधून मानवाकडे येतात, जसे कोरोना हा रोग वटवाघुळातून माणसात आला.

त्यामुळे सार्वजनिक आरोग्य संशोधन संस्थांमधेही पशुवैद्यकाची गरज पडते. काही लसी तयार करताना अथवा तयार झालेल्या लसींचे परीक्षण करताना पशूंची आवश्यकता असते. त्यामुळे तिथेही पशुवैद्यकाची गरज असते.

शिवाय दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, मांस उत्पादन आदी उत्पादक संस्थांमधेही पशुवैद्य गरजेचा असतो. म्हणजे या अभ्यासक्रमानंतर अनेक क्षेत्रांत देशात-परदेशात संधी आहेत. मागणी जास्त आणि तुलनेने पुरवठा कमी असल्याने पदविकाधारकही या क्षेत्रात कार्यरत आहेत.

सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या काळात ४ ते ६ लाख रुपयांचे वार्षिक वेतन पशुवैद्यांना मिळू शकते. पशुवैद्यकीय परिचारिका, पशुवैद्यकीय तंत्रज्ञ आणि पशुवैद्यकीय सहाय्यक यांसारख्या पूरक वैद्यकीय (पॅरामेडिकल) कामगारदेखील असतात. पशुसांठी भौतिकोपचार किंवा दंतचिकित्सा यांसारखे विशेष अभ्यासक्रमदेखील आहेत.

आवश्‍यक कौशल्ये

सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणिशरीरशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांतील सैद्धांतिक तज्ज्ञता तर इथे लागतेच, पण निरीक्षणकौशल्य, मनोकायिक कौशल्ये, हस्तकौशल्य आणि प्राण्यांशी संवादकौशल्यही उत्तम लागतात. प्राण्यांची भाषा समजून घेणे सोपी गोष्ट नाही. न बोलता येणाऱ्या छोट्या बाळांवर आणि प्राण्यांवर केवळ लक्षणांवरून उपचार करणे महाकठीण काम आहे. याशिवाय उत्तम स्मरणशक्ती, त्रिमितीय विचारक्षमता यांचीही जोड लागते.

चिकित्सा करताना स्थिर मन लागते. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या प्राण्यांना वाचवताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. प्रसंगी स्वतःचा जीवही धोक्यात घालावा लागतो. रात्री-अपरात्री काम करावे लागते.

त्यांच्यावर उपचार करताना किळस येऊन चालत नाही. मारुती चितमपल्ली, प्रकाश आमटे, जेन गुडाल यांच्यासारख्या प्राणिप्रेमींनी प्राण्यांना सांभाळून एक आदर्श घालून दिला आहे. डेव्हिड ॲटनबरोसारख्या चित्रपटनिर्मात्यांनी प्राण्यांविषयीची जागरूकता निर्माण केली आहे. ॲनिमल वेलफेअर, RESQ सारख्या संस्था या क्षेत्रात मोठे सेवाभावी काम करत आहेत.

जबाबदारी व परंपरा

भारतीय तत्त्वज्ञानात ‘सर्वे सन्तु निरामयः’ असे म्हटलेले आहे. भारतात प्राचीन काळापासून पशुचिकित्सा चालू असल्याचे दाखले आहेत. सम्राट अशोकाच्या काळातील ‘शालीहोत्र संहिता’ हा या विषयावरील सर्वात प्राचीन ग्रंथ असावा.

गाई, हत्ती व घोडे हे अन्न व आर्थिक उत्पन्नाचे स्रोत असल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले गेले. मानवासहीत ही सर्व जीवसृष्टी अस्तित्वात राहावयाची असेल, तर संपूर्ण परिसंस्था व्यवस्थित राहणे आवश्यक असते. अन्नसाखळी व अन्नजाळे यातील एक दुवा तुटला, तरी संपूर्ण सृष्टीवर त्याचा परिणाम होतो याची जाणीव लोकांना होती.

थोडक्यात काय, पशुवैद्यकीय शास्त्र हे पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेलं आणि आजच्या काळात महत्त्व अधिकच वाढलेलं महत्त्वाचं क्षेत्र आहे. तशी क्षमता आणि वृत्ती असेल तर अवश्य या क्षेत्रात येण्यासारखे आहे. मात्र भूतदयेसाठी, प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी पशुवैद्य बनायचे की, मनुष्यहितासाठी प्राण्यांचा उपयोग करून घेण्यासाठी या क्षेत्रात यायचे हा निर्णय मात्र कठीण आहे, हे मात्र नक्की!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com