सैनिकी वसतिगृहाच्या प्रवेशासाठी येत्या ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार | Military Hostel News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission
सैनिकी वसतिगृहाच्या प्रवेशासाठी येत्या ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार

सैनिकी वसतिगृहाच्या प्रवेशासाठी येत्या ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून पुणे शहरात शिक्षणासाठी येऊ इच्छिणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या मुला-मुलींना वसतिगृह प्रवेशासाठी येत्या ३० जूनपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात पुण्यात राहून शिक्षण घेऊ इच्छिणारे माजी सैनिकांचे मुले आणि मुली यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. या वसतिगृह प्रवेशासाठी युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व सध्या सेवेत असलेल्या सैनिकांचे पाल्यांना प्रवेश देण्यात येतो. इच्छुकांनी वसतिगृह प्रवेशासाठी संबंधित वसतिगृह अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य आहे.

या वसतिगृहाच्या प्रवेशासाठीचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज हे पर्वती येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह व नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे येत्या १ जूनपासून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) यांनी सांगितले.

प्राप्त झालेल्या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी आणि पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींचा वसतिगृह प्रवेश निश्‍चित करण्यासाठीची वसतिगृह व्यवस्थापन समितीची बैठक त्या त्या वसतिगृहांमध्ये येत्या ४ जुलैला घेतली जाणार आहे. यावेळी पालक व प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी संबंधित वसतिगृहामध्ये उपस्थित राहाणे आवश्‍यक आहे. यावेळी पालकांनी सेवानिवृत्तीबाबतचे पुस्तक, पीपीओ, माजी सैनिक ओळखपत्र, विधवा ओळखपत्र, ईसीएचएस ओळखपत्र आदी सैन्यातील कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. दरम्यान, कोरोनामुळे विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वसतिगृह प्रवेश अर्ज जमा करण्याची तारीख वाढवून दिली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Applications For Admission To Military Hostel Can Be Submitted Till June 30 Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top