पीएच.डी प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची यंदाच्या शैक्षणिक वर्षाची पीएच.डी प्रवेश परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी होणार असून, यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.

पीएच.डी प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची यंदाच्या शैक्षणिक वर्षाची पीएच.डी प्रवेश परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी होणार असून, यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.

पीएच.डी साठी किती जागा विभागनिहाय उपलब्ध आहेत. याची माहिती विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक २६६ मध्ये जाहीर केले आहे. हे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी एकूण ३ हजार १८७ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी सुरुवातीला उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल, त्यांनतर मुलाखत होऊन त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. एम. फिल, नेट, पेट २०२१ परीक्षा उत्तीर्ण उमेवारांना ही परीक्षा न देण्याची सवलत देण्यात आली आहे. सविस्तर माहिती http://bcud.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Apply For Phd Admission By 30th September Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..