'MBBS'च्या शंभर जागांना आयोगाची मंजुरी; सहकारमंत्र्यांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलीय.

'MBBS'च्या शंभर जागांना आयोगाची मंजुरी

कऱ्हाड : सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी (Satara Government Medical College) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलीय. त्या महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या (MBBS Course) शंभर जागांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची (National Medical Commission) मंजुरी मिळालीय. आगामी वर्षापासून महाविद्यालय सुरु होणार असून त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचे सहकार्य लाभल्याचे सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी आज सांगितले.

साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, असे सांगूण पालकमंत्री पाटील म्हणाले, जानेवारी 2012 मध्ये साताऱ्यासाठी 419 कोटी खर्चाचे 100 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न 500 खाटांचे रुग्णालय मंजूर झाले. मात्र, पुढील कार्यवाही झाली नाही. सातारा शहरवासियांची गरज लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार सातारा शहरालगतची कृष्णनगर येथील जलसंपदा विभागाची 64 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा व त्या बदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जागा जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार ती प्रक्रिया झाली आहे.

हेही वाचा: 'भाजपला सोबत घेऊन NCP नं 11 जागा केल्या बिनविरोध'

महाविद्यालयासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार यांनी दिले आहे. महाविद्यालयासाठी नवी इमारत उपलब्ध होईपर्यंत जिल्हा रुग्णालय व आरोग्य यंत्रणेचा उपयोग करुन आगामी शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरु करण्यात येईल. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नुकतेच सातारा जिल्हा रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्र पाठवून सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना मंजुरी देत असल्याचे कळवले आहे, असे सांगूण मंत्री पाटील म्हणाले, एमबीबीएसच्या शंभर जागा निर्माण झाल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे.

हेही वाचा: निवडणुकीत सर्व 'राजे' बिनविरोध होऊन निवांत झाले; पण 'याचं' काय?

loading image
go to top