दु:खाबाबतचा दृष्टिकोन बदलूया...

रमेश सूद
Thursday, 20 February 2020

आपले स्वतःचे मनच आपल्याला त्या दिशेने ढकलत असते. कधीकधी दु:खी वाटणे हेच खरंतर आपल्यासाठी चांगले असते.

इम्प्रूव्ह युअरसेल्फ
माझी आई १९८२मध्ये मला सोडून इहलोकी गेली. त्यानंतरचे काही दिवस माझ्या मनात तिच्या स्मृती इतक्या तीव्र होत्या, की मी तिच्याबद्दलच्या पूर्ण भावना, अनुभव लिहू शकत होतो. या काळात माझ्यासमोर अनेक मोठ्या अडचणी होत्या. तरीही माझे वर्तन एकदम शांत होते. मी प्रत्येकाशी अतिशय नम्रतेने वागत होतो. कुणावरही चिडत नव्हतो किंवा उद्धटपणे वागत नव्हतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आई गेल्याच्या दु:खाचा माझ्यावर वेगळाच परिणाम होत होता. मला एकटे वाटत होते, तरीही मी इतरांना मदत करण्यासाठी उत्सुक होतो. माझ्या वागण्याबोलण्यातील बदल पाहून लोक म्हणत होते, ‘‘रमेशमध्ये बदल झालाय.’’ आज आयुष्यात मागे वळून पाहताना इतर काही व्यक्तींना गमावल्यावरही अशाच प्रकारची भावना मनात निर्माण झाली. ती या विशिष्ट काळात लोकांना मार्गदर्शन केले, याचे मला आश्‍चर्य वाटते. 

अखेरीस मला उत्तर सापडलेय. सध्याच्या संशोधनानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे - दु:ख ही नकारात्मक भावना नाही, कारण ती आपल्याला अधिक दयाळू, शांत बनवते. नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रेरित करते. कदाचित अधिक सृजनशीलही बनवते. एखाद्या प्रसिद्ध कलाकाराने त्याची सर्वांत सुंदर कलाकृती तो दु:खी असतानाच बनवलेली असते. दु:ख सृजनशीलतेला असे जन्म देते. जरा विचार करा, आपल्यापैकी अनेकजण कसे यू-टयूबवर जुनी, दु:खी गाणी सर्च करत असतात. आपल्याला कधीकधी दु:खी व्हायलाही आवडते. 

आपले स्वतःचे मनच आपल्याला त्या दिशेने ढकलत असते. कधीकधी दु:खी वाटणे हेच खरंतर आपल्यासाठी चांगले असते. माझा अनुभवही असाच आहे. मी अतिशय दु:खी होतो, तेव्हा मी सर्वोत्तम कविता लिहिली. या कवितेला स्पर्धेमध्ये पारितोषिकही मिळाले. वेदनेतून साहित्य निर्माण होते, ते असे. आपल्याकडे दु:खाकडे नैराश्याच्या नकारात्मक भावनेने पाहिले जाते. मात्र, आपण दु:ख म्हणजे नैराश्य नव्हे, हे लक्षात ठेवलेच पाहिजे. 

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about change perspective

Tags