कौशल्यविकासाला ‘ऑनलाइन बूस्ट’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

ऑनलाइन व्यावसायिक कौशल्यविकास अभ्यासक्रमांत तब्बल ६३ टक्के वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. एकूणच, भावी काळ ऑनलाइन शिक्षणचाच असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये, तसेच अनेक ऑफिसेस बंद असल्याने सगळ्यांचा भर डिजिटल किंवा ऑनलाइन शिक्षणावर आहे. लॉकडाउन काळात डिजिटल शिक्षणात पन्नास टक्क्यांची वाढ झाल्याचे ‘नास्कॉम’च्या ताज्या अहवालात म्हटले आहे. 

दुसरीकडे, व्यावसायिकांनी आणि नोकरदारांनीही काळाची पावले ओळखून विविध ऑनलाइन अभ्यासक्रम करण्याचा सपाटा लावला आहे. ऑनलाइन व्यावसायिक कौशल्यविकास अभ्यासक्रमांत तब्बल ६३ टक्के वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. एकूणच, भावी काळ ऑनलाइन शिक्षणचाच असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एज्युकेशन ॲप्सची संख्या आणि ती डाउनलोड होण्याचे प्रमाणही वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्टार्टअप्सना नवा मार्ग
डिजिटल शिक्षणाच्या वाढत्या विस्तारामुळे या क्षेत्रात उतरू इच्छिणाऱ्या स्टार्टअप्सच्या संख्येत मोठी वाढ.
डिजिटल शिक्षण या विषयात अनेक संधी दिसत असल्याने त्यावर अनेक स्टार्टअप्सचा भर.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन शिक्षणातील अडथळेही स्पष्ट
अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिविटी आणि विजेची समस्या असल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळा. विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण भागांत जास्त समस्या असल्याचे स्पष्ट.
पायाभूत तांत्रिक गोष्टी हाताळण्यात सगळेच शिक्षक आणि शिक्षण संस्था सक्षम नसल्याचे सिद्ध. 
शिक्षण संस्थांना बँडविड्थ किती लागते इथपासून अनेक गोष्टींवर खूप काथ्याकूट करावा लागल्याचे स्पष्ट.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Online Boost for Skill Development

Tags
टॉपिकस
Topic Tags: