मनातलं : संकल्पना निश्‍चिती हवी

आनंद महाजन
Thursday, 12 March 2020

शालेय पुस्तकांची रचना पालकांनी व मुलांनी समजून घेणे गरजेचे आहे. पुस्तकांची पाने वाढतात आणि मुलांवर अभ्यासाचा ताण वाढत जातो.  विषयांची व्याप्ती वाढल्यामुळे काही नवीन आव्हाने समोर येतात. 

शालेय पुस्तकांची रचना पालकांनी व मुलांनी समजून घेणे गरजेचे आहे. पुस्तकांची पाने वाढतात आणि मुलांवर अभ्यासाचा ताण वाढत जातो.  विषयांची व्याप्ती वाढल्यामुळे काही नवीन आव्हाने समोर येतात. 

1) नवीन आव्हाने
१. संकल्पना निश्‍चिती गरजेची. 
२. अवघड व किचकट वाटणारे शब्द लक्षात ठेवावेत. 
३. परीक्षेच्या ‘फॉरमॅट’नुसार प्रश्‍न थोडासा फिरवून विचारल्यास ‘कन्सेप्ट’ समजली असल्यासच उत्तर लिहिता येते. 
४. इतिहासात मुलांना वेगवेगळ्या घटना व त्यांच्या तारखा व वर्ष लक्षात ठेवावे लागतात. हे सर्व पाठ करणे मुलांना थोडे अवघड वाटते. 

2) वाढत्या वयातल्या मुलांच्या अभ्यासविषयक समस्या 
१. पुस्तक उघडून दोन तास अभ्यास करूनही तो लक्षात राहत नाही. 
२. विषयाची संकल्पना न समजल्यामुळे धडा अवघड वाटतो आणि अभ्यासाची उत्सुकता राहत नाही. 
३. फिजिक्स, केमिस्ट्रीची समीकरणे समजणे अवघड जाते. 
४. गणित विषयाची धास्ती निर्माण होते. 
मुलांना परीक्षेत बसल्यावर जाणवते, की काही प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला माहीत असूनही उत्तर आठवत नाही. 

3) मुलांच्या वर्तणुकीत बदल
१. मार्क न मिळाल्यामुळे आत्मविश्‍वास कमी होतो. 
२. मनःस्थिती बिघडते. 
३. रात्री झोप कमी लागते. 
४. मुले घरामध्ये कमी बोलतात, मित्रांना भेटणे टाळतात. 
५. वर्गात शांत बसतात. 
६. बऱ्याच मुलांमध्ये व्हिटॅमिन B१२ आणि व्हिटॅमिन D३ ची कमतरता आढळून येते. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवतो आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. 
    मुले एकलकोंडी, ‘मूडी’ होतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडणे, प्रश्‍नाचे सरळ उत्तर देत नाहीत. पालकांना हा बदल आश्‍चर्यकारक असतो व त्यांच्या नकळत मुलांवर चांगले मार्क मिळवण्याचे ध्येय बिंबवले जाते. मुले अजून तणावाखाली येतात. हे एक चक्रव्यूह आहे.  

4) पालकांनी काय करावे? 
१. सातवीपासून मुलांच्या अभ्यासाकडे काटेकोर लक्ष ठेवावे. 
२. मुलांना संकल्पना समजत नसल्यास स्वतः ती समजून घेऊन मुलाला समजून द्यावी. शिक्षिकांचीही मदत घ्यावी.
३. पुस्तकातील काही संकल्पना मुलांना सहज विचारा. त्याचे चुकीचे उत्तर पालकांनी सांगावे. त्यामुळे मुले बोलती होतील व त्या प्रश्‍नाचे अचूक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतील. ही पद्धत वापरल्यास मुले पुढे येऊन आत्मविश्‍वासाने उत्तर देतात. 
४. अभ्यास करताना दोन मुलांनी एकत्र अभ्यास करावा. 
मुलांना संकल्पना समजण्याची गुरुकिल्ली सापडल्यावर त्यांचा पुढचा शाळेचा प्रवास स्वतःसाठी आणि पालकांसाठी सुखमय होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article anand mahajan on The concept must be fixed