भविष्य नोकऱ्यांचे : 'ए आय' बद्दल आणखी कोठे शिकायचे?

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 12 March 2020

आतापर्यंत लेखमालेमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि त्यातील काही महत्त्वाच्या व्यवसाय संधीबद्दल बोललो. या लेखात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील उपयुक्त संदर्भ सांगणार आहे. या विषयातील सर्वांना समजणारा असा पाठ प्रा. अँड्रू इंग यांनी त्यांच्या ‘सगळ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयामध्ये घालून दिला आहे. हा विषय https://www.deeplearning.ai/ai-for-everyone/ या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे. हा विषय केवळ केवळ अभियंत्यांसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला एक विना-तांत्रिक अभ्यासक्रम आहे.

आतापर्यंत लेखमालेमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि त्यातील काही महत्त्वाच्या व्यवसाय संधीबद्दल बोललो. या लेखात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील उपयुक्त संदर्भ सांगणार आहे. या विषयातील सर्वांना समजणारा असा पाठ प्रा. अँड्रू इंग यांनी त्यांच्या ‘सगळ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयामध्ये घालून दिला आहे. हा विषय https://www.deeplearning.ai/ai-for-everyone/ या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे. हा विषय केवळ केवळ अभियंत्यांसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला एक विना-तांत्रिक अभ्यासक्रम आहे. आपल्याला हे तंत्रज्ञान समजण्यास आणि त्याचा वापर आपल्या संस्थेतील समस्यांची उकल करण्यात मदत करू शकेल का, हे आपण शोधू शकता. कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते आणि करू शकत नाही याची उदाहरणे आपण पाहाल. अखेरीस या सर्वांचा समाजावर काय प्रभाव पडेल आणि या बदलांना कसे सामोरे जावे याचा उहापोह केला आहे. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असाल आणि आपणास संगणक आज्ञावली लिहिता येत असल्यास आपणासाठी प्रा. अँड्रू इंग यांचा मशीन लर्निंग अर्थातच साधन शिक्षण हा विषय सुरुवातीच्या अभ्यासातही निवडू शकता. हा विषय जगभरातून लाखो विद्यार्थी दरवर्षी घेत असतात. हा अभ्यासक्रम खालील संकेतस्थळावर मोफत स्वरूपात उपलब्ध आहे : https://www.coursera.org/learn/machine-learning. साधन शिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची एक शाखा आहे त्यात आपण संगणकाला प्रत्यक्ष आज्ञावलीशिवाय ठरावीक गोष्टींमध्ये तरबेज करण्याचा प्रयत्न करतो. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्राध्यापक महाशयांनी एक एक संकल्पना अशी काही सोपी करून सांगितली आहे की, अभ्यासाची मजा काही औरच असते. वास्तविक हा सर्व गणिताधारित भाग, पण आवश्यक तेवढेच गणित ठेवून, क्लिष्ट गोष्टींना फाटा देण्यात आला आहे. प्रत्येक भागानंतर संगणक आज्ञावली दिली आहे. अशा पद्धतीमुळे मूळ संकल्पना आणि त्यांची आज्ञावलीतील रूपांतर समजण्यास फार मदत होते. 

आपणास हे दोन अभ्यासक्रम कसे वाटले आम्हाला जरूर कळवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr aashish tendulkar