संधी नोकरीच्या : परदेशातील महाविद्यालये व उद्योगजगत समन्वय

College
College

जगातील अनेक प्रगत देशांत महाविद्यालये व उद्योगजगत यांच्यातील समन्वयासाठी सरकार भरपूर मदत करते. ‘ट्रिपल हेलिक्स’ या मॉडेलनुसार अमेरिकेसारख्या प्रगत देशात महाविद्यालये,  उद्योग व सरकार एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे तेथील उद्योग महाविद्यालये यांच्यात अतिशय उत्कृष्ट समन्वय साधला जातो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • जपानमध्ये खालील ३ प्रकारांत महाविद्यालये व उद्योगांतील समन्वय घडतो. 

१. Collaborative Research 
२. Contract Research 
३.  Academic Donation

  • जर्मनीमध्ये २००२ पूर्वीपर्यंत अशा संशोधनातून होणाऱ्या पेटंटवर फक्त प्राध्यापकांचाच अधिकार असायचा. विद्यापीठे व उद्योगाला त्याचा फायदा खूपच कमी असायचा, मात्र २००२ मध्ये आलेल्या ‘इन्व्हेंटर्स लॉ’ या कायद्यान्वये प्राध्यापकांबरोबरच अशा पेटंटवर विद्यापीठ व उद्योगाला देखील त्याचे फायदे दिले जाऊ शकतात. प्राध्यापकाला त्यातून होणाऱ्या नफ्याच्या ३०% वाटा मिळविता येतो. जर्मनीमध्ये एकूण संशोधन खर्चाच्या सुमारे दोन तृतीयांश खर्च उद्योगांतर्फे केला जातो. देशाच्या जीडीपीच्या  सुमारे ३% खर्च संशोधनावर खर्च करण्याचा जर्मनीचा प्रयत्न असतो.  
  • चीनमध्ये विद्यापीठे व उद्योगजगत यांच्यातील समन्वयासाठी मुख्यतः सरकारी यंत्रणेतर्फे प्रयत्न केले जातात. चीन सरकारतर्फे १९९२मध्ये यासाठी धोरण आखले गेले. तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी २००२मध्ये कायदा केला गेला. चीनच्या २००७ मधील कायद्यानुसार ४ प्रकारांत पेटंट व कॉपीराईट विभागले जातात. चीनमध्ये बऱ्याचशा पेटेंटचा वापर करण्याचे अधिकार सरकारकडे ठेवले जातात. 
  • ऑस्ट्रेलियामध्ये संशोधक विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. छोटे उद्योग जास्त प्रमाणावर असू,न ते देशाच्या विविध भागात विखुरलेले असतात. त्यामुळे उद्योग-शैक्षणिक जगत यांच्यातील समन्वय कमी आहे.
  • भारतातदेखील उद्योग-महाविद्यालये यांतील समन्वय वाढण्यासाठी सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न व्हायला हवेत. तसेच अमेरिकेतील Bayh-Dole या १९८०च्या कायद्याप्रमाणे उत्तम कायदा लवकरात लवकर यायला हवा. उद्योग जगत व महाविद्यालये यांची राज्यभर क्लस्टर्स करायला हवीत. व वर्षभरासाठी काय उपक्रम करणार याचे वेळापत्रक बनवायला  हवे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com