संधी नोकरीच्या : स्वीजलची स्वप्नवत सक्सेस स्टोरी!

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 5 November 2020

खानदेशातील लोणखेडा येथील एका गावातूनच शालेय व बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन आपल्या मेहनतीच्या जोरावर आज स्वप्नवत आयुष्य जगणाऱ्या स्वीजल पाटील या तरुणाची ही कहाणी. शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वीजलचे दहावीला असतानाच आयुष्यात जास्तीत जास्त शिकून जगातील मोठ्या शहरात चुणूक दाखविण्याचे स्वप्न होते. 

खानदेशातील लोणखेडा येथील एका गावातूनच शालेय व बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन आपल्या मेहनतीच्या जोरावर आज स्वप्नवत आयुष्य जगणाऱ्या स्वीजल पाटील या तरुणाची ही कहाणी. शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वीजलचे दहावीला असतानाच आयुष्यात जास्तीत जास्त शिकून जगातील मोठ्या शहरात चुणूक दाखविण्याचे स्वप्न होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याने बारावीनंतर २००८ मध्ये पुण्यातील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणकशास्त्रात प्रवेश घेतला. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच आयुष्यात पुढे काय करिअर करायचे, याचे नियोजन स्वीजलने सुरू केले. त्याप्रमाणे तिसऱ्या वर्षाला अभियांत्रिकीच्या कॅम्पस प्लेसमेंटसाठीची व त्याचबरोबर परदेशात ‘एमएस’चे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जीआरई परीक्षेची तयारी एकाच वेळी सुरू ठेवली.

अभ्यासाबरोबरच खेळ व महाविद्यालयातील इतर उपक्रमात स्वीजल नेहमीच भाग घेत असे. 

कॅम्पस प्लेसमेंटसाठी आवश्यक गोष्टींची प्रचंड तयारी करून एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळवायची, दोन वर्षे नोकरी करायची. दरम्यानच्या काळात अमेरिकेतील कुठल्या विद्यापीठात ‘एमएस’ करायचे, त्यासाठीची चांगली महाविद्यालये शोधायची, अशी योजना त्याने आखली व त्यावर अंमलबजावणी सुरू केली. पुण्यातीलच दिलीप ओक सरांकडे ‘जीआरई’चे मार्गदर्शन घेतले व ३१३ गुण मिळविले. त्याचप्रमाणे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये टीसीएस कंपनीत नोकरी देखील मिळवली. २०१२ ते २०१४ पर्यंत त्याने ‘टीसीएस’मध्ये नोकरी केली व दरम्यान अमेरिकेतील चांगल्या विद्यापीठांबद्दल माहिती घेतली व काही चांगल्या विद्यापीठांत अर्ज केले. त्यातून त्याला स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या स्टोनी ब्रूक येथील विद्यापीठात ‘एमएस’साठी (संगणकशास्त्र) प्रवेश मिळाला.

परदेशातील हे शिक्षण घेतानाचे अनुभव सांगताना स्वीजल म्हणतो, ‘‘आपल्या भारतीय विद्यापीठांमध्ये पुस्तकी ज्ञानावर भर असतो. मात्र, अमेरिकेतील त्याच्या विद्यापीठात प्रॅक्टिकल वा तांत्रिक ज्ञान, हे प्रात्यक्षिके व प्रोजेक्टमधून मिळविण्यावर जास्त भर होता. दुसऱ्या वर्षाला असताना जगप्रसिद्ध ‘ॲमेझॉन’ कंपनीत मी इंटर्नशिप केली. तिथे उत्तम दर्जाचे तांत्रिक ज्ञान मिळाले.’’

बुद्धिमत्तेची चुणूक दाखविल्याने ‘ॲमेझॉन’ने त्याला पूर्ण वेळ नोकरीची संधी दिली. ७० लाख रुपये वार्षिक पगार व २० लाख रुपये जॉइनिंग बोनस अशा एकूण ९० लाख रुपये पगाराच्या नोकरीवर स्वीजल २०१६मध्ये रुजू झाला.

तीनच वर्षांत त्याने चांगली प्रगती दाखविल्यामुळे आता त्याला १.३६ कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो. पुणे विद्यापीठातूनच संगणकशास्त्राची पदवी घेतलेल्या तरुणीशी त्याचा विवाह झाला असून, ती अमेरिकेतील सिएटल विद्यापीठातून ‘एमएस’चे शिक्षण घेते आहे. तीन भावंडांच्या शेतकरी कुटुंबातील एका सामान्य घरातील तरुणाची ही प्रगती खरेच वाखाणण्यासारखी आहे. वसतिगृहातील मित्रांकडून एकमेकांना सांभाळून घेत प्रगती साधण्याची वृत्ती व टीमवर्क शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.

स्वीजलचा तरुणांना संदेश 
अभियांत्रिकीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच करिअरची योजना आखा आणि तिसऱ्या व चौथ्या वर्षात खूप मेहनत करून कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरी वा उच्च शिक्षणासाठीच्या परीक्षेचे चांगले गुण मिळवा. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shitalkumar ravandale on job Opportunity