esakal | इम्प्रूव्ह युअरसेल्फ - प्रश्‍न बदलताना...
sakal

बोलून बातमी शोधा

इम्प्रूव्ह युअरसेल्फ - प्रश्‍न बदलताना...

मी त्या व्यक्तीबद्दल काय विचार करतो?
या एका बदलानं खूप मोठा फरक घडवून आणलाय. मला काहीतरी सृजनशील, उत्पादनक्षम करण्यासाठी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वेळ मिळतोय. प्रश्‍नातील या एका बदलामुळं माझं आयुष्य सोपं झाले. प्रत्येक क्षणाला मी माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार काम करू लागलो. त्यामुळंच इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, या प्रश्‍नानं मला क्वचितच छळलं.

इम्प्रूव्ह युअरसेल्फ - प्रश्‍न बदलताना...

sakal_logo
By
रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर

माझ्या डायरीतून १९९२-९३...

मी आता पूर्वीपेक्षा खूप आनंदी झालोय, असं मला वाटतंय. मला सातत्यानं छळणारा प्रश्‍न मी बदलला आहे, हे यामागचं कारण होय. तो प्रश्‍न म्हणजे -

ती व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल?

या प्रश्‍नाची जागा आता दुसऱ्या एका प्रश्‍नाने घेतलीय.

मी त्या व्यक्तीबद्दल काय विचार करतो?

या एका बदलानं खूप मोठा फरक घडवून आणलाय. मला काहीतरी सृजनशील, उत्पादनक्षम करण्यासाठी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वेळ मिळतोय. प्रश्‍नातील या एका बदलामुळं माझं आयुष्य सोपं झाले. प्रत्येक क्षणाला मी माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार काम करू लागलो. त्यामुळंच इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, या प्रश्‍नानं मला क्वचितच छळलं. मी नव्या पद्धतीनं आयुष्य जगू लागलो. त्याचप्रमाणं स्वतःलाही अशाप्रकारे हाताळू लागलो की, ज्याचा स्वतःला किंवा इतरांना त्रास होणार नाही. आपल्या मनामध्ये आपण स्वतः अडथळे, असुरक्षितता, भीती निर्माण केलेली असते, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. खरंतर, मूलभूत मानवी भावना आणि वर्तन कधीही बदलत नाही. 

मला आज २८ वर्षानंतरही हीच गोष्ट लागू पडते. मी इतरांच्या भावना समजून घेणारा कोच आहे, तो त्यामुळंच. मी भावनिक बुद्धिमत्तेचा प्रमाणित प्रशिक्षक नसेलही. तरीही इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर स्वतःच्या भावनांशी बौद्धिक मैत्री करणं म्हणजे काय हे मला समजलं आहे. ‘स्व -जागरूकता’ ही याची गुरुकिल्ली आहे. ती मला कोणतीही गोष्ट सहजसोपी आणि योग्य करण्याचा मार्ग दाखवते. खरंतर, आपल्यापैकी बहुतेकजण ‘इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील?’ या प्रश्‍नात नको तितकं अडकतात. त्यातून योग्य गोष्टींचा वेळ वाया जातो. तुम्हीही माझ्यासारखा हा बदल करू शकता. 

सध्या त्यासाठी वेळही आहे. तेव्हा सुरुवात करताय ना?