इम्प्रूव्ह युअरसेल्फ : योग्य कृतीचे महत्व

रमेश सूद
Thursday, 11 June 2020

मला माझ्या बालपणाचा एक प्रसंग आजही आठवतो. हा प्रसंग अगदी छोटा असला, तरी त्याने खूपच मोठा संदेश दिला. माझ्या मनावर खोल संस्कार केला. संध्याकाळची ती कातरवेळ होती. मी माझ्या वडिलांचे बोट पकडून रस्त्यावरून चालत होतो. अचानक ते रस्त्याच्या उजव्या बाजूला वळले. त्यांनी मलाही त्यांच्यासोबत खेचले.

मला माझ्या बालपणाचा एक प्रसंग आजही आठवतो. हा प्रसंग अगदी छोटा असला, तरी त्याने खूपच मोठा संदेश दिला. माझ्या मनावर खोल संस्कार केला. संध्याकाळची ती कातरवेळ होती. मी माझ्या वडिलांचे बोट पकडून रस्त्यावरून चालत होतो. अचानक ते रस्त्याच्या उजव्या बाजूला वळले. त्यांनी मलाही त्यांच्यासोबत खेचले. आम्ही रस्त्याच्या जवळपास मध्यभागी पोचलो. त्या ठिकाणी एक वीट पडली होती. ती त्यांनी उचलून रस्त्याच्या बाजूला टाकली. त्यामुळे, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका टळला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीचा हा छोटासा प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला. त्यातून मी वडिलांकडून योग्य कृती करण्याचा पहिला धडा शिकलो. त्यानंतर, आयुष्यात पुढेही हा धडा मी गिरवत गेलो. आयुष्यात योग्य कृती करणे खरेच खूप महत्त्वाचे असते. अन्यथा, दुर्दैवी घटना ओढवू शकते. आपल्या अशा प्रकारच्या कृतीमधून लहान मुलेमुलेही शिकत असतात. तुम्हीही योग्य वेळी योग्य कृती करताय ना? त्याचप्रमाणे, एखादी योग्य कृती करताना स्वत:ची काळजी घेणे आणि स्वत:ला सुरक्षित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे. कोरोनाविरुद्धच्या युद्धात हे योग्यच ठरेल. बरोबर ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on improve yourself

Tags
टॉपिकस
Topic Tags: