इम्प्रूव्ह युअरसेल्फ : भीतीच्या भावनेच्या मुळाशी...

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 2 July 2020

कोरोनाचा विषाणू आता जगभरात पसरला आहे. मी एके दिवशी पुण्यातील मगरपट्टा परिसरातील माझ्या नेहमीच्या ठिकाणी बसलो होतो. एवढ्यात एकजण माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘सर, आपल्या येथे एका आयटी कंपनीमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडलाय. त्यानंतर कंपनीच्या सीईओंनी सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी काळजी घेण्याचे पत्र पाठविले आहे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊ नये, असेही त्यांनी या पत्रात म्हटलेय.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण या कार्यालयापासून तसे जवळच आहोत, हे लक्षात आल्यावर भीतीची एक लहर अचानक माझ्या सुप्त मनात उमटली. या भीतीतून बाहेर पडायला आता आणखी काही काळ तरी लागेल, असेही मला जाणवले. 

माझी ही अंतःप्रेरणा खरी ठरली. एवढेच नव्हे, तीन महिन्यांनंतरही भीतीची ही भावना अस्तित्वात आहे. ती आता पूर्वीपेक्षा अधिक वाढलीय की, पूर्वीच्याच प्रमाणात आहे याचे उत्तर देणे अवघड आहे. कारण, या मोठ्या कालावधीत अनेकजण घराबाहेरच पडलेले नाहीत. त्याचप्रमाणे किराणा किंवा इतर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात जाणाऱ्या व्यक्तींकडून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. त्यामुळे एखाद्या कुणी ‘मी घाबरत नाही,’ किंवा ‘माझ्या मनात भीतीचा लवलेशही नाही,’ असे म्हणणे धडधडीत खोटेपणाचे ठरेल. खरेतर भीतीची भावना मुळात नैसर्गिकच असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला या विषाणूची भीती वाटणेही साहजिकच. 

एखादी व्यक्ती असे म्हणते, ‘मी कशालाही घाबरत नाही. जे व्हायचंय ते होऊद्या,’ त्या वेळी मी अशा अज्ञानी व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय निवडतो. एखाद्या गोष्टीची भीती वाटणे हे ठीकच आहे, कारण भीतीच्या भावनेचे मूळ प्रेमाच्या भावनेमध्ये आहे. हे तर आपले जीवनावरचे प्रेम असते. आपले आपल्या आयुष्यावरचे आणि जवळच्या व्यक्तींवरचे प्रेमही आपल्याला सांगते की, आपण सुरक्षित राहायला हवे. आपण स्वतःला सुरक्षित ठेवले तरच आपल्या पुढच्या पिढीलाही सुरक्षित ठेवू शकतो, असे मला वाटते. तुम्हाला पण तसेच वाटत असेल, नाही का?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on improve yourself

Tags
टॉपिकस
Topic Tags: