इम्प्रूव्ह युअरसेल्फ : युद्ध आतले आणि बाहेरचे...

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 9 July 2020

‘तुम्ही कोरोनाबद्दल नेमका काय विचार करता?’’ एकाने मला विचारले.
मी म्हणालो, ‘‘कोरोनाबद्दल अधिक विचार करण्यासारखे काय आहे? तो तर त्या एखाद्या व्यक्तीसारखा आहे, जी धोकादायक असते. तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या प्रियजनांनाही तिच्यापासून दूर ठेवण्याची गरज असते. तुम्ही अशा व्यक्तीबद्दल विचार करत राहण्याची गरज नसते. त्यामुळे, स्वत:ला सुरक्षित ठेवून कोरोनापासूनही दूर राहा. यावर अधिक विचार करण्याची किंवा त्या विषयावर पुन:पुन्हा चर्चा कशाला करायची?’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कोरानामुळे अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांवर किती विपरीत परिणाम झालाय, यावर तरी तुम्ही विचार केलाच असेल ना?’’ त्याने मला पुन्हा प्रश्‍न विचारला. 
‘‘नाही, मी यावरही विचार केला नाही कारण मी त्या विषयावर विचार करण्याइतका सक्षम नाही.’’ मी त्याला उत्तर दिले.

यावर तो मला पुन्हा म्हणाला, ‘‘तुम्ही तुमच्या सर्व अनुभवावरून काही बोलू शकता?’’
मी म्हणालो, ‘‘नेमका कशाचा अनुभव? खरे तर पृथ्वीवरील कोणत्याही सजीवाने यापूर्वी या विषाणूचा अनुभव घेतलेला नाही. त्यामुळे मी अनुभवाच्या आधारे बोलू शकत नाही.

माझ्या कल्पनाशक्तीच्या जोरावर मला हवे असलेले चित्र रेखाटू शकतो, इतकेच. हे ठीकच आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष कोरोनापेक्षा विविध प्रकारच्या काळज्यांची तीव्रता वाढेल. त्यामुळे आपल्याला स्वत:च्या अंतरंगात एक प्रकारचे मानसिक युद्धही लढावे लागेल. अशा प्रकारच्या अंतर्गत युद्धासाठीही आपल्याला तयार व्हावे लागेल.

कोरोनापुरतेच बोलायचे तर तुम्ही मास्क, सोशल डिस्टन्ससारखे नियम पाळून स्वतःचे व इतरांचेही रक्षण करू शकता. तुम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी प्रार्थनाही करता येईल. मात्र, तुम्ही उरलेली सर्व शक्ती स्वत:ला आतून मजबूत करण्यावर खर्च केली पाहिजे. काहीजण याला लवचीकपणाही म्हणू शकतात, जो मजबूत राहण्यासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आव्हाने किंवा अडथळ्यांवर मात करून सध्याच्या काळाशी सुसंगत राहण्यासाठीही तो गरजेचा आहे. फक्त एक दिवस, दररोज, आत्तासाठी..’’
‘हम्म..’’ त्याची प्रतिक्रिया.
तुम्ही कोणती लढाई लढणार आहात? तुम्हाला पुढे कोणती लढाई दिसतेय?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on improve yourself

Tags
टॉपिकस
Topic Tags: