इम्प्रूव्ह युअरसेल्फ : हम होंगे कामयाब....

रमेश सूद
Thursday, 16 July 2020

होय, आपण सर्वजण सध्या कठीण काळातून जात आहोत, यात काहीच शंका नाही. कोरोना आणि लॉकडाउनमुळे संपूर्ण जगच विस्कळीत झाले आहे. पुढे काय होणार, हे आपल्याला मार्च महिन्यात माहीत नव्हते. आपण खूप चिंताग्रस्त होतो. आपले हे जग सुरळीत कसे होणार, याची काळजीही होती. 

होय, आपण सर्वजण सध्या कठीण काळातून जात आहोत, यात काहीच शंका नाही. कोरोना आणि लॉकडाउनमुळे संपूर्ण जगच विस्कळीत झाले आहे. पुढे काय होणार, हे आपल्याला मार्च महिन्यात माहीत नव्हते. आपण खूप चिंताग्रस्त होतो. आपले हे जग सुरळीत कसे होणार, याची काळजीही होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता आपण जुलै महिन्याच्या मध्यात पोचलोय. जवळपास चार महिने उलटले आहेत. मी आजही दररोज काहीतरी लिहितो. तुमच्याशी आठवड्याला या सदरातून छान संवाद 
साधतो. तुम्हीही वाचन करत असाल, काहीजण लेखनही करत असतील. काहीजणांनी कार्यालयात जायला सुरुवात केली असेल, तर काहीजणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असेल. बहुतेक जणांच्या जीवनावर या सर्वांमुळे परिणाम झालाय, हे मात्र खरे. तरीही, आजही जगात प्रत्येकजण पूर्वीप्रमाणेच आपापली जगण्याची लढाई लढतोय. अशा कठीण परिस्थितीतही काही देवदूत इतर गरजू व्यक्तींना मदतीचा हात देत आहेत, ही गोष्ट अधिक खरी म्हणावी लागेल.

खरे तर यापूर्वीही आपल्यापैकी बहुतेकांना संघर्ष करावा लागत होताच, फरक एवढाच, की तो आपल्या अस्तित्वासाठी आपण करत नव्हतो, तर आपल्या लाइफ स्टाईल’साठी संघर्ष करत होतो. आता तो अस्तित्वाचा बनलाय. आपण हे युद्ध निश्चितपणे जिंकू. त्यानंतर, पुन्हा लाइफ स्टाईल’च्या संघर्षात गुंतून जावू. आपण ती पुन्हा मिळवू हेही निश्चितच. आणखी काही वेळ लागेल पण आपण पूर्वीसारखे होऊ, तेही पूर्वीपेक्षा अधिक लवचिक होऊन. माझी मात्र यापेक्षा आणखी काही बदल होण्याची इच्छा आहे. मी दररोज सकाळी ईश्वराला प्रार्थना करतो, की मानवी वर्तनामध्ये करुणा, सहानुभूती, इतरांबद्दलचा विचार रुजेल, अशा पद्धतीने मनुष्यांमध्ये बदल घडव. तुम्हीही माझ्याबरोबर प्रार्थनेत सहभागी होणार ना?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on improve yourself

Tags
टॉपिकस
Topic Tags: