इम्प्रूव्ह युअरसेल्फ : चला, डोळ्यांना जपूया...

Eye
Eye

तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घेताय का? सध्या कोरोना, लॉकडाउनमुळे बहुतेकजण लॅपटॉप, स्मार्टफोनवर भरपूर वेळ घालवत आहेत. त्यामुळे, अशा परिस्थितीत डोळ्यांची काळजी घेण्याची गरज आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी खालील दोन व्यायाम करा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) सर्वांत जवळच्या एखाद्या वस्तूकडे किंवा तुमच्या हाताकडे पाहा. त्यानंतर, हळहळू तुमची नजर सर्वांत दूरच्या वस्तूकडे किंवा इमारत, झाडासारख्या गोष्टीकडे वळवा. त्यानंतर, पुन्हा हळूवारपणे जवळच्या वस्तूवर ती आणा. क्षितिजसमांतर असणाऱ्या जवळच्या व लांबच्या वस्तूंकडे आलटूनपालटून पाहा. दिवसभरातून ही कृती अनेक वेळा करा. त्यामुळे, तुमचे डोळे तरतरीत, ऊर्जावान होण्यास मदत होईल.   

2) खुर्चीवर सरळ बसा. तुमच्यासमोर टेबल किंवा डेस्क असावा. डायनिंग टेबलवरीही तुम्ही हा व्यायाम करू शकता. तुमच्या हातांचे कोपर टेबलावर ठेवून आरामशीर बसा. आता तुम्हाला चष्मा असल्यास तो काढा. डोळे बंद करा. त्यानंतर, हातांचे दोन्ही तळवे एकमेकांवर काही सेकंद जोरात घासा. ते एकत्रितरित्या डोळ्यांवर ठेवा. हातांची ओंजळ करा. डोळ्यांवर तळहात ठेवलेल्या स्थितीत दोनतीन मिनिटे बसून राहा. त्यानंतर, हात काढून डोळे सावकाश उघडा. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी वाटेल. आपली दृष्टी थोडीशी अधिक स्वच्छ झाल्याची जाणीवही होईल. दिवसभरात तुम्हाला गरज वाटेल, तेव्हा तुम्ही हा व्यायाम करू शकता. 

मी साधारणपणे ४६ वर्षांपूर्वी एका कोचिंग कॅप्ममध्ये डोळ्यांचे हे व्यायाम शिकलो, तेव्हा मी अवघा १४ वर्षांचा होतो. मला या व्यायामाचा फायदा झाला, तुम्हालाही तो होईल, अशी आशा व्यक्त करतो. काही दिवस करून तर पाहा. स्वत:च फरक अनुभवा आणि मग पुन्हा जीवनाच्या धावपळीत सहभागी व्हा. तुमच्या डोळ्यांना ‘ब्रेक’ हवाच.    

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com