इम्प्रूव्ह युअरसेल्फ : कर लो दुनिया मुठ्ठीमे...

रमेश सूद
Thursday, 13 August 2020

‘सर, मी माझी नोकरी गमावली. त्यामुळे मला खूप वाईट वाटतेय,’ एकेदिवशी एकाने मला फोन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. हा अवघड काळ. तो माझा जवळचा सहकारी होता.
मी शांत राहिलो. मग त्याला विचारले.
‘तुला अशा प्रकारे नोकरी गमावणे अपेक्षित होते का?’
तो म्हणाला, ‘होय सर, अशा प्रकारचे संकेत मिळत होते.’

‘सर, मी माझी नोकरी गमावली. त्यामुळे मला खूप वाईट वाटतेय,’ एकेदिवशी एकाने मला फोन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. हा अवघड काळ. तो माझा जवळचा सहकारी होता.
मी शांत राहिलो. मग त्याला विचारले.
‘तुला अशा प्रकारे नोकरी गमावणे अपेक्षित होते का?’
तो म्हणाला, ‘होय सर, अशा प्रकारचे संकेत मिळत होते.’ 
मी विचारले, ‘मग,आता तुझा आत्मविश्‍वास कसा आहे?’
‘तो तर चांगलाच आहे. तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखता,’ त्याने स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

होय. तो अशाच प्रकारची व्यक्ती होता. त्यामुळे मी म्हणालो, ‘मग तर तू काहीच गमावलेले नाही. होय ना? प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासातूनच विकसित होते. ही परिस्थिती लवकरच बदलेल मात्र तुझ्यामधील आत्मविश्वासाला ती कशी हाताळावीशी वाटते?’

तो म्हणाला, ‘सर, सर्वप्रथम माझा ‘आत्मविश्वास’ मला शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिले पाहिजे, असे सांगतोय. त्यामुळे, मी दिवसातील काही वेळ व्यायाम आणि ध्यानासाठी देतोय. त्यानंतर मी काही कोर्ससाठी नाव नोंदवून नवीन कौशल्ये शिकणार आहे. लेखन आणि काही पुस्तकांचे वाचन हीसुद्धा एक चांगली कल्पना आहे. त्याचप्रमाणे एरवी आठवण येणाऱ्या जवळच्या व्यक्तींना फोन करणेही आलेच. या सर्व गोष्टी माझ्या आत्मविश्वासाला कराव्याशा वाटतात.’

‘त्याही एकदम आत्मविश्वासाने, बरोबर ना?’ मी त्याला दाद देत प्रोत्साहित केले
‘अगदी बरोबर सर, आता तुम्ही पाहाच; मी माझ्यातले सर्वोत्तम कसे कायम ठेवतो. काहीतरी चांगले लवकरच घडेल. कदाचित तीच नोकरी मिळेल.’ आता त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला होता.

मी त्याला म्हणालो, ‘तू मला शांत राहण्याचे वचन देशील का?’
तो म्हणाला, ‘होय सर, मी तुम्हाला शांत राहण्याचे वचन देतो.’
मी पुन्हा विचारले, ‘कदाचित पूर्वीसारखाच शांत ना?’
‘हो का नाही?’ 
‘होय’त्याने आत्मविश्वासाने उत्तर दिले.
मला खात्री आहे की तो त्यातून अधिक कणखर होऊन बाहेर पडेल. खरेतर असा दृष्टिकोन असलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत कणखर राहील. तुम्हीही हा दृष्टिकोन ठेवताय ना?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on improve yourself

Tags
टॉपिकस
Topic Tags: